‘महायुतीच्या नीट बातम्या द्या, नाहीतर गोळ्या घालू’, AK-47 रोखत अजित पवारांचं मिश्किल वक्तव्य.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एके 47 हातात घेत, अनेकांवर निशाणा साधला. दोघांनी त्यांच्या नजरेत असणाऱ्यांवर नेम धरला. अजित दादांनी तर थेट मीडियाचे प्रतिनिधी आणि कॅमरामेनचा एके 47ने वेध घेतला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांना उद्देशून मिश्किल वक्तव्य केलं आहे. महायुतीच्या नीट बातम्या द्या, नाहीतर गोळ्या घालू, असं अजित पवार मिश्किलपणे म्हणाले आहेत. यावेळी अजित पवार यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील होते. दोन्ही नेत्यांच्या हातात AK-47 रायफल देखील होती. यावेळी अनेक अधिकारी आणि पत्रकारांच्या गराड्यात दोन्ही नेते AK-47 पाहत होते. याचवेळी अजित पवार यांनी संबंधित मिश्किल वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या सर्वांमध्ये एकच हशा पिकला.मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याच्या चाकणमध्ये आधुनिक क्षेपणास्त्र संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलं. यावेळी दोन्ही दिग्गज नेत्यांनी AK-47 चा अनुभव घेतला.दोन्ही नेत्यांनी एके 47 हातात घेत, अनेकांवर निशाणा साधला. दोघांनी त्यांच्या नजरेत असणाऱ्यांवर नेम धरला. अजित दादांनी तर थेट मीडियाचे प्रतिनिधी आणि कॅमरामेनचा एके 47ने वेध घेतला. “महायुतीच्या चांगल्या बातम्या द्या, अन्यथा आम्ही दोघे तुम्हा सर्वांना उडवून टाकू”, अशी मिश्किल टिप्पणी करत अजित दादांनी मीडियावर निशाणा साधला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.