तेव्हापासूनच फडणवीसांचा धनंजय मुंडेंवर वरदहस्त! करुणा मुंडेंनी काळवेळेसह सगळंच सांगितलं.

जिल्हाधिकारी कार्यालयात डीपीसीसीची बैठक असताना मला मारहाण झाली. पोलिसांसमोर मला शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी व्हावी. ती झाली तर तेव्हाच्या जिल्हाधिकाऱ्यांची नोकरी जाईल, अशा शब्दांत मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा मुंडेंनी त्यांना झालेला त्रास माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितला.मुंबई: जिल्हाधिकारी कार्यालयात डीपीसीसीची बैठक असताना मला मारहाण झाली. पोलिसांसमोर मला शिवीगाळ करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी व्हावी. ती झाली तर तेव्हाच्या जिल्हाधिकाऱ्यांची नोकरी जाईल, अशा शब्दांत मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नी करुणा मुंडेंनी त्यांना झालेला त्रास माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितला. धनंजय मुंडेंवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वरदहस्त खूप आधीपासूनच असल्याचं म्हणत करुणा मुंडेंनी काळ वेळ सांगून टाकली. वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं धनंजय मुंडेंना घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवलं आहे. करुणा मुंडेंना महिना २ लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर करुणा मुंडे माध्यमांशी बोलत होत्या.

‘जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांसमोर मला मारहाण झाली. ही साधी गोष्ट नाही. आजपर्यंत मला माझ्या आईनं कधी साधी चापटदेखील मारलेली नाही. एक गुंड मला कानशिलात लगावून गेला. मला नको त्या पद्धतीनं स्पर्श करुन गेला. जिल्हाधिकारी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज काढा. तेव्हा दिपा मुधोळ मुंडे मॅडम जिल्हाधिकारी होत्या. सीसीटीव्ही फुटेज समोर आलं तर त्यांची नोकरी जाईल. त्यांनी या प्रकरणातील पुरावे नष्ट केले, असे गंभीर आरोपी पंकजा मुंडेंनी केले.’न्यायालयीन लढाईसाठी माझ्याकडे पैसे नव्हते. मी रात्री गाडीत झोपायचे. कारण हॉटेलमध्ये रुम बुक करायला पैसे नव्हते. त्यामुळे रात्री कारमध्येच झोपायचे. ही सत्यासाठीची लढाई आहे. मला आज न्याय मिळाला. कारण मी न्यायासाठी लढत होते,’ असं करुणा मुंडे म्हणाल्या. ‘धनंजय मुंडेंवर देवेंद्र फडणवीसांचा वरदहस्त ते विरोधी पक्षनेते असल्यापासूनच आहे. त्यानंतर अजित पवार तर आहेतच. इतक्या मोठ्या शक्ती पाठिशी आहेत,’ असा दावा करुणा मुंडेंनी केला.पोलिसांसमोर, जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये मला मारहाण झाली. शिवीगाळ करण्यात आली. तेव्हा तिथे गुंड, पोलीस सगळे होते. डीपीडीसीची बैठक असताना हा प्रकार घडला. त्या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी व्हावी. मारहाण झाल्याचं मी घरी येऊन मुलांना सांगितलं. मुलांनी पतीला विचारणा केली. तर पती त्यांना म्हणाला, आई खोटं बोलतेय. पण या सगळ्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं. सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली होती. ते फुटेज मला अद्याप मिळालेलं नाही, अशी आपबिती करुणा मुंडेंनी सांगितली.वाल्मिक कराडनं मला मारहाण केली. डीजी, फडणवीसांना मी त्याबद्दल तक्रार केली. पण माझी तक्रार घेतली गेलीच नाही. मुंबईत राहात होते, तेव्हा पोलीस कधीही घरी यायचे. मला उचलून न्यायचे. त्यामुळे मी मुंबई सोडून बीडला गेले. मी धनंजय मुंडेंवर खूप प्रेम केलंय. त्यांच्यासोबत भावनिक नातं आहे. त्यांनी प्रेमानं सांगितलं तर मी त्यांच्यासाठी जीवदेखील देईन. पण जोरजबरदस्तीनं काही होणार नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.