रेल्वेत मोठ्या चोऱ्या करणारी टोळी अटकेत !

रेल्वेमध्ये चोऱ्या करणाऱ्या नायडू गॅगला अटक करण्यात अमळनेरच्या रेल्वे पोलिसांना यश आले असून आरोपींना पकडून त्यांच्याकडून चोरीतील २ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सविस्तर वृत्त असे कि, मध्य रेल्वे च्या खंडवा, भुसावळ आणि जळगाव आरपीएफकडून मोबाईलवर ४ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता अमळनेरचे एएसआय कुलभूषणसिंग चौहान यांना माहिती मिळाली की, खंडवा स्टेशनवर प्रवाशांचे साहित्य चोरी झाल्याची घटना घडली असून त्यात एक गँग सहभागी आहे. ते एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर कपडे बदलवून रूप बदलतात, असे सीसीटीव्ही फुटेज ही प्राप्त झाले होते.

तर या संदर्भात खंडवा स्टेशनवर एफआयआर दाखल झाली आहे. त्यानंतर हे सराईत गुन्हेगार भुसावळ ते उधना गाडी (क्रमांक १९१०६) मध्ये रवाना झाल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक सत्यजित कुमार यांना प्राप्त झाली. त्यांच्या मार्गदर्शनाने कुलभूषणसिंग यांनी अमळनेरचे कर्मचारी हेडकॉन्स्टेबल नंदू पाटील, अर्जुनसिंग यांना अमळनेर स्टेशनवर मेमो गाडी आली असता गुन्हेगारांचा शोध घेण्यास सांगितले. तीन ते चार डबे तपासल्यावर सामान्य कोचमध्ये चार संशयित व्यक्ती आढळून आल्यात. त्यांना पोलिसांनी घेराव घालून त्यांची उलट तपासणी सुरू केली. तिकीट आहे का? यावरून त्यांना स्टेशनवर चौकशीला उतरवले. पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवताच त्यांनी त्यांची नावे अविनाश महारनन्ना नायडू (वय २५), अजय महारनन्ना नायडू (वय २५), काली कुन्नईया नायडू (वय २९) हे तिघे रा. वाकीपाडा (मरीमाता मंदिराजवळ) नवापूर, महाराष्ट्र आणि राजा आरमबम (वय ३३, रा. अमरनगर, उज्जैन, मध्यप्रदेश) असे सांगून त्यांनी नायडू गँग चे सदस्य असल्याचे सांगितले. या नायडू गँगमध्ये सात ते आठ सदस्य असून त्यांनी रेल्वेमध्ये तसेच विविध शहरात वेगवेगळ्या ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या जवळून जप्त केलेल्या साहित्यात २ लॅपटॉप, ६ मोबाईल, चार्जर, घड्याळ, ४६ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ८१ हजार रुपयांचे साहित्य तसेच दोन चाकू जप्त करण्यात आले असून आरोपींना वरिष्ठ निरीक्षकांकडे सोपवण्यात आले आहे. नायडू गँगचे सदस्य सापडल्याने मोठ्या चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.