बापरे : चौथीतील विद्यार्थिनीशी शिक्षकाचे घाणेरडे कृत्य.

राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसह महिलावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी होण्याचे नाव घेत नसताना आता पुन्हा एकदा चौथीतील विद्यार्थिनीशी सलग दोन ‎‎दिवस छेडछाड केल्याची घटना‎ जालना तालुक्यातील मौजपूरी‎ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जिल्हा ‎‎परिषदेच्या प्राथमिक शाळेत घडली. ‎‎प्रल्हाद सोनुने असे संशयित‎ शिक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे ‎‎गावात आणि जिल्ह्यात खळबळ ‎उडाली आहे. घटनेनंतर संशयित ‎‎शिक्षकाला ग्रामस्थांनी चोप देऊन ‎‎पोलिसांकडे सोपवले.‎

सविस्तर वृत्त असे कि, पीडित मुलगी ३ आणि ४ फेब्रुवारी ‎‎रोजी शाळेत गेली होती. सर्व मुले ‎‎मैदानात खेळत असताना शिक्षक‎ सोनुने यांनी तिला रुममध्ये बोलावू न ‎घेत तिच्याशी झोंबाझोंबी केली.‎ कुणाला सांगितले तर तुला खूप‎ मारेल, अशी धमकी दिली.‎घाबरलेली मुलगी रडतच घरी गेली. ‎‎ मामी आणि आजीने विचारल्यानंतर‎तिने घडलेली घटना सांगितली.‎मुलीच्या नातेवाईकांनी ही घटना ‎‎गावातील सरपंच, उपसरपंच आणि ‎‎केंद्रप्रमुखांना सांगितली. त्यानंतर‎गावात बैठक बोलावण्यात आली.‎शिक्षकाला बोलावून विचारणा केली‎असता तो अरेरावी करू लागला.‎संतप्त ग्रामस्थांनी शिक्षकाला‎शाळेतच चोप दिला. पोलिस वेळेत‎पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎कायदा हातात घेऊ नका,‎संशयिताला योग्य शिक्षा होईल, असे ‎पोलिसांनी बजावल्यानंतर ग्रामस्थ‎शांत झाले. मौजपूरी पोलिसांना ‎बोलावून संशयिताला त्यांच्या ताब्यात‎ देण्यात आले आहे.‎

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.