अज्ञात वाहनावर रुग्णवाहिका आदळली : दोन ठार, पाच जखमी !

नाशिकजवळ समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघाताची घटना ताजी असतांना आता नाशिकहून एका रुग्णाला पटना (बिहार)‎येथे उपचारांसाठी घेऊन जाणारी ‎रुग्णवाहिका समृद्धी महामार्गावर ‎‎हडसपिंपळगाव येथे पाठीमागून अज्ञात ‎‎वाहनाला धडकली. त्यामुळे‎ रुग्णवहिकेतील दोन जण ठार, तर पाच‎जण जखमी झाले.मिळालेल्या माहितीनुसार, हडसपिंपळगाव शिवारात बुधवारी ‎पहाटे हा अपघात झाला. समीर मोहम्मद ‎‎(५७) रा. बिहार व अमीना खातून (५२)‎रा. बिहार अशी अपघातातील मृतांची नावे ‎‎आहेत. तर प्रकाश विक्रम पाटील (४५)‎रा.नाशिक, मोहम्मद इम्तियाज (४०) रा.‎बिहार,गुलाबसा खातुन (२०) रा. बिहार,‎सचिन रामदास खरे (४२) रा.‎नाशिक,हासीब समीर मोहम्मद‎ ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎(३७)रा.बिहार हे या अपघातात जखमी‎ झाले आहेत.

याबाबत पोलिसांकडून‎मिळालेल्या अधिक माहितीनुसार समीर‎ मोहम्मद या रुग्णाला घेऊन त्यांचे‎नातेवाईक रुग्णवाहिका क्रमांक एमएच १५‎इएफ ००८९ द्वारे नाशिक येथून पटणा‎येथील एम्स रुग्णालयात दाखल‎करण्यासाठी बिहारकडे जात असताना‎बुधवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास‎हडस पिंपळगाव शिवारात अज्ञात वाहनशी‎पाठीमागून रुग्णवाहिका धडकली.‎अपघातानंतर महामार्ग पोलिस विभागाचे‎हेड कॉन्स्टेबल सचिन पाटील, महामार्ग‎सुरक्षा बलचे शिवाजी बेळे, वैजापूर‎ठाण्याचे किरण गोरे यांनी तातडीने वैजापूर‎येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल ‎केले.‎ तिथे वैद्यकीय अधिकारी यांनी समीर‎मोहम्मद व अमिना खातून यांना तपासून‎मृत घोषित केले. तर अन्य जखमींवर‎उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.‎या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी‎तातडीने धाव घेत मदतकार्य केले.
  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.