पुण्यात वाहनांची तोडफोड करणाऱ्या गुंडांची पोलिसांनी धिंड काढून अद्दल घडवली आहे. बिबेवाडीमध्ये 40 हून अधिक गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांची धिंड काढली. आता याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.










