शिक्षकांना साखर गोळा करण्याचा आदेश; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा..

जळगाव : शालेय पोषण आहार योजनेत विद्यार्थ्यांना गोडधोड खाऊ देण्यासाठी शासनाने शाळा प्रशासनाला लोकसहभागातून साखर गोळा करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, हा आदेश शिक्षकी पेशाचा अपमान करणारा असल्याचे मत व्यक्त केले आहे.

या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे यांनी जिल्हा परिषद शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यांनी सांगितले की, “शिक्षक व शिक्षिका हे शिक्षण क्षेत्राचे आधारस्तंभ आहेत. मात्र, त्यांना घराघरातून साखर गोळा करण्यासाठी पाठवणे म्हणजे शिक्षकी पेशाची थट्टा आहे. महाराष्ट्र राज्य भिकेला लागलेले नाही. शिक्षकांना त्यांच्या मूळ शैक्षणिक कार्यात संपूर्ण मोकळीक मिळाली पाहिजे.”मनसेच्या वतीने या निर्णयाच्या निषेधार्थ पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत.
शासनाने तातडीने हा आदेश रद्द करावा.शिक्षकांना त्यांच्या मूळ शैक्षणिक कार्यावर लक्ष केंद्रित करण्याची संधी द्यावी.शाळांमध्ये कोणत्याही प्रकारच्या साहित्य संकलनासाठी शिक्षकांचा वापर टाळावा.जर शासनाने हा आदेश मागे घेतला नाही, तर मनसेच्या वतीने जळगाव जिल्ह्यात “साखर भेट आंदोलन” राबवले जाईल, असा इशारा दिला आहे.यावेळी ॲड. जमील देशपांडे यांनी स्पष्ट केले की, “हा निर्णय तातडीने मागे घेतला नाही, तर आंदोलनामुळे शिक्षण विभागाला नाचक्कीला सामोरे जावे लागेल. याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील.”या निर्णयाविरोधात शिक्षकांमध्येही नाराजी पसरली असून, मनसेच्या या पावलाला मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष जमील देशपांडे यांच्यासह वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष रज्जाक सय्यद, जनहित कक्षाचे राजेंद्र निकम, उपशहर अध्यक्ष चेतन पवार, सतीश सैंदाणे, शेतकरी सेनेचे अविनाश पाटील, जनहित चे संदीप मांडोळे, ललित शर्मा, प्रकाश जोशी, प्रदीप पाटील उपस्थित होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.