विवाहित गर्लफ्रेण्डच्या बापाने मेजवानीला बोलावलं अन् पाहुण्याच्या घरी संपवलं, मग… बीडमध्ये खळबळ.

विवाहितेची प्रेमसंबंध असल्याच्या कारणातून तिच्या घरच्यांनी प्रियकराची हत्या केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. प्रियकराला मेजवानीसाठी बोलावून त्याची हत्या केली.विवाहित तरुणाला प्रेम प्रकरणातून पाहुण्याच्या घरी जेवनाच्या बहाण्याने बोलावून घेत त्याचा खून करून मृतदेह महामार्गावर फेकून दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. धाराशीव जिल्ह्यात ही घडली असून हत्या झालेला तरुण हा बीड जिल्ह्यातील साळेगाव येथील आहे.

या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील साळेगाव येथील एक तरुण मुस्तकिन जब्बार शेख हा धाराशिव जिल्ह्यातील मोहा ता. कळंब येथे एका मस्जिदमध्ये धार्मिक शिक्षण देण्याचे काम करीत आहे. मुस्तकिन शेख याचे लग्न झालेले असून त्याला एक मुलगा व मुलगी आहे; परंतु त्याची पत्नी व त्याचे आपसात पटत नसल्याने ते दोघे विभक्त राहत होते. दरम्यान, मुस्तकिन शेख याचे पुणे येथे मूळची बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथील असलेल्या एका विवाहित महिलेसोबत ओळख झाली आणि त्या दोघांचे प्रेमसंबंध जुळले. मात्र, त्यांचे हे सबंध त्या महिलेचे वडील आणि भाऊ यांना मान्य नव्हते. याबाबत दोघांच्याही घरच्यांनी त्यांना समजावून सांगितले; मात्र त्यांनी त्यांचे ऐकले नाही.दरम्यान, मुस्तकिन शेख याने त्याच्या आई-वडिलांना ते दोघे लग्न करणार असल्याचे सांगितले होते. यामुळे त्या महिलेचे वडील सरदार शेख व भाऊ अकबर शेख यांनी मुस्तकिन शेख याला जिवे मारण्याची धमकी सुद्धा दिली असल्याचे त्याने त्याच्या वडिलांना सांगितले होते.त्यानंतर त्या महिलेचे वडील सरदार शेख, भाऊ अकबर शेख, दुसरा भाऊ व त्याचा मेव्हणा या चौघांनी २ फेब्रुवारीला रात्री १२:०० वाजता मुस्तकिन शेख याचा खून करून त्याचा मृतदेह धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणाऱ्या महामार्गावर फेकून अपघात घडल्याचा बनाव केला.मृत मुस्तकिन शेख यांच्या खून प्रकरणी त्याचे वडील जब्बार शेख यांच्या तक्रारी वरून वाशी पोलीस ठाण्यात सरदार शेख, त्याचा मुलगा अकबर शेख व दुसरा मुलगा आणि त्यांचा मेव्हणा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले हे तपास करीत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.