चार दिवसांपासून बेपत्ता, सगळीकडे शोधाशोध, दोन तरुणी विहिरीत संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत आढळल्या.

गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या दोघी संशयास्पद परिस्थितीत मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने नाशिक हादरले आहे.घोटी – काळुस्ते मार्गावर शेणवड बंधाऱ्यालगतच्या विहिरीत दोन मुलींचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी ही घटना घडली असावी, असा अंदाज आहे. त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही.घोटीजवळील कांचनगाव परिसरात शेणवड बु. शिवारातील डॅमचे पाणी सोडण्याच्या आउटलेट जवळील विहिरीत सोमवारी दोन मुलींचे मृतदेह तरंगताना आढळले. मनीषा भाऊ पारधी (वय १९) व सरिता काळू भगत (वय १८, दोघीही रा. ठाकूरवाडी, कांचनगाव) असे मृतदेह आढळलेल्या मुलींची नावे आहेत.

घोटीचे पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजय कौटे, हवालदार केशव बस्ते, भाऊसाहेब बिन्नर आदींनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. स्थानिक नागरिक व युवकांच्या मदतीने हे दोन्ही मृतदेह पाण्याबाहेर काढून घोटी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.या दोन्ही मुली चार दिवसांपासून बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले. त्यात एक मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पालकांनी १ फेब्रुवारी रोजी घोटी पोलिस ठाण्यात केली होती. पालक नातलग व परिसरात मुलींचा शोध घेत होते. घोटी पोलिसांनी याबाबत आकस्मित मृत्यूची नोंद केली असून, शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर व तपासाअंती त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले.

मित्रांना उधारीवर दिलेले शंभर रुपये परत मागणाऱ्या तरुणाचा सहा जणांनी जबर मारहाण करून खून केल्याची घटना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नीलगिरी बाग परिसरात घडली. श्याम राजू कुचेकर (वय २१, रा. पेठरोड) असे मृताचे नाव असून, त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे नोंद आहेत. या प्रकरणी सहा संशयितांविरुद्ध आडगाव पोलिसांत गुन्हा नोंद आहे.श्याम कुचेकरची आई मंजुळा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित रोहित धुळे, सचिन काळे, सागर भोसले, संजय रणशिंगे, सुनील मोरे, प्रवीण लोणकर (सर्व रा. नीलगिरी बाग) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद आहे. यापैकी मोरे याला श्यामने शंभर रुपये उसने दिले होते. शुक्रवारी रात्री साडेसातला मोरेकडे कुचेकरने पैसे मागितल्याचा राग आल्याने संशयितांनी जबर मारहाण केली. दांडक्याने मारहाण केल्याने कुचेकरने आरडाओरड केली. परिसरातील नागरिकांची गर्दी झाल्याने संशयित पसार झाले. दरम्यान, रविवारी रात्री कुचेकरचा मृत्यू झाल्याने खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.