रॅगिंगविरोधात बडगा! ‘या’ १८ वैद्यकीय महाविद्यालयांवर विद्यापीठ अनुदान आयोगाची कारवाई; ‘कारणे दाखवा’ नोटीस.

उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठांमध्ये अनेकदा विद्यार्थ्यांना त्यांच्या वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून छळवणुकीला सामोरे जावे लागते. याचा विपरित परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होतो. अनेकदा तर या रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. याला प्रतिबंध करण्यासाठी २००९मध्ये अँटी-रॅगिंग रेग्युलेशन लागू करण्यात आले. यूजीसीने गेल्याच आठवड्यात देशभरातील सर्व शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे यांना पत्रक पाठवत या नियमावलीचे कठोर पालन करण्याची सूचना केली होती.विविध उच्च शिक्षणसंस्था आणि विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांच्या छळवणुकीवर म्हणजेच रॅगिंगवर वचक बसवण्यासाठी, विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) केलेल्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल १८ वैद्यकीय महाविद्यालयांवर कारवाई करण्यात आली आहे. नऊ राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील महाविद्यालयांवर ही कारवाई झाली असून त्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली आहे. आता सात दिवसांत या महाविद्यालयांना उत्तर देणे बंधनकारक असून तसे न झाल्यास यूजीसी दंड ठोठावण्यासोबत कठोर कारवाईचा पवित्रा घेणार आहे.

उच्च शिक्षण संस्था आणि विद्यापीठांमध्ये अनेकदा विद्यार्थ्यांना त्यांच्या वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून छळवणुकीला सामोरे जावे लागते. याचा विपरित परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर होतो. अनेकदा तर या रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. याला प्रतिबंध करण्यासाठी २००९मध्ये अँटी-रॅगिंग रेग्युलेशन लागू करण्यात आले. यूजीसीने गेल्याच आठवड्यात देशभरातील सर्व शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे यांना पत्रक पाठवत या नियमावलीचे कठोर पालन करण्याची सूचना केली होती.आता यूजीसीने आंध्र प्रदेश (तीन महाविद्यालये), बिहार (तीन), आसाम (दोन), तमीळनाडू (दोन), दिल्ली (दोन), तेलंगणा (एक), पश्चिम बंगाल (एक), उत्तर प्रदेश (एक), मध्य प्रदेश (एक) या नऊ राज्यांमधील १६ आणि पाँडिचेरी या केंद्रशासित प्रदेशातील दोन अशा एकूण १८ महाविद्यालयांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. या महाविद्यालयांनी अँटी-रॅगिंगबद्दलच्या सूचनांचे पालन न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. आता सात दिवसांत या महाविद्यालयांना उत्तर पाठवणे बंधनकारक आहे. हे उत्तर न आल्यास यूजीसी या महाविद्यालयांवर दंडात्मक कारवाईसोबतच इतरही ठोस पावले उचलू शकते, असे यूजीसीने पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.रॅगिंगच्या घटना रोखण्यासाठी प्रत्येक संस्थेत अँटी-रॅगिंग समितीची स्थापना करणे, महत्त्वाच्या ठिकाणांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, रॅगिंगविरोधात जनजागृती करण्यासाठी अँटी रॅगिंग कार्यशाळा, परिषदा यांचे आयोजन, विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणे, विद्याथ्यर्थ्यांमधील रॅगिंग करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच्या परिणामांची कल्पना देणे, अॅडमिशन केंद्र, फी भरणा केंद्र, वाचनालय, उपाहारगृह, वसतीगृह आदी महत्त्वाच्या ठिकाणी अँटी-रॅगिंग पत्रके लावणे आदी गोष्टी करणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांसाठी यूजीसीने राष्ट्रीय अँटी-रॅगिंग हेल्पलाइन क्रमांकही (anti ragging helpline phone number) जाहीर केला आहे. विद्याथ्यर्थ्यांना रॅगिंगचा त्रास झाल्यास किंवा त्यांना अशा घटना आढळल्यास ते १८००-१८०-५५२२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात, असे यूजीसीने स्पष्ट केले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.