लग्नाला अवघे बारा दिवस बाकी अन् एका हल्ल्याने सारेच संपले, तरुणाचा अंत; नातेवाईक आक्रमक.

 लग्नाला अवघे बारा दिवस बाकी असलेल्या तरुणासोबत भयंकर घडले आहे. रेल्वे स्टेशनवर बोलावत राजस्थानाच्या दोन प्रवाशांवर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे.लग्नाला अवघे बारा दिवस बाकी असलेल्या तरुणासोबत भयंकर घडले आहे. तरुण रेल्वेने गावी जात असताना जागेच्या वादातून जमावाने त्याच्यासह आणखी एकावर चाकू हल्ला केला. त्यात या २७ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सकाळी साडेअकरा वाजेदरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. घटनेतील हल्लेखोरांचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी जोपर्यंत हल्लेखोरांना अटक होत नाही. तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, असा पवित्रा घेतल्याने वातावरण तापले होते.

चेन्नई जोधपूर एक्सप्रेस प्रवास करीत असताना जागेवर बसण्याच्या वादातून सुमेरसिंग जबरसिंग राजपूत (वय 27) व पर्वतसिंग डोंगरसिंग राजपूत (वय 40) या दोघांवर दहा ते पंधरा जणांनी हल्ला केला. हल्ल्यात दोन्ही प्रवाशांवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. दोघेही जखमी प्रवाशांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जखमींपैकी सुमेरसिंग जबरसिंग राजपूत रा.गुडियाला, जिल्हा जोधपुर, राज्य राजस्थान या युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. युवकाचा २० फेब्रुवारीला विवाह होणार होता. विवाह आधीच युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जोपर्यंत आरोपींना पोलीस अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा देखील नातेवाईकांनी घेतला आहे. नातेवाईकांनी पोलीस प्रशासनाच्या कारवाईसंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.चेन्नई जोधपूर एक्सप्रेसच्या जनरल बोगीत बसण्याच्या वादातून राजस्थानच्या दोन प्रवाशांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना 2 फेब्रुवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. भुसावळ रेल्वे स्टेशनवरुन चढलेल्या एका प्रवाशासोबत बाचाबाची नंतर त्यांने फोनवरुन आपले काही साथीदार नंदुरबार रेल्वे स्टेशनवर बोलावत राजस्थानाच्या दोन प्रवाशांवर धारदार शस्त्राने हल्ला केला आहे. या हल्यात. या हल्लांनतर जखमी प्रवाशांना उपचारासाठी नंदुरबार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अर्धा ते पाऊण तासाच्या खोळंब्यानंतर चेन्नई जोधपूर एक्सप्रेस जोधपूरकडे रवाना करण्यात आली. या घटनेच्या काही क्षणात रेल्वेच्या लोहमार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी हल्लेखोरांनी वापरलेले धारदार शस्त्र जमा केले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.