” शिकता शिकता शिकणं कधी सोडू नका ! ” प्रा डॉ जयंत लेकुरवाळे यांचे निरोप समारंभ येथे प्रतिपादन.

” शिकता शिकता शिकणं कधी सोडू नका ! ” प्रा डॉ जयंत लेकुरवाळे यांचे निरोप समारंभ येथे प्रतिपादन .डी . एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण – निरोप समारंभ: वक्ते प्रा . डॉ .जयंत लेकुरवाळे विद्यार्थी कल्याण विभाग क .ब .चौ .उ.म .विद्यापीठ जळगांव यांनी “नवीन वाटा,नवीन दिशा”बाबत केले अनमोल मार्गदर्शन .डी. एस. देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, थोरगव्हाण (ता. रावेर) येथे इयत्ता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ प्रमुख वक्ते प्रा. डॉ. जयंत लेकुरवाळे यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाला.
या प्रसंगी निरोपार्थी विद्यार्थी, पालक व माता-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. डॉ. जयंत लेकुरवाळे सरांनी “नवीन वाटा,नवीन दिशा” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी नवीन शैक्षणिक धोरण, प्रगत तंत्रज्ञान व करिअर संधींचा योग्य उपयोग कसा करावा, याविषयी मोलाच्या टिप्स दिल्या.विद्यार्थ्यांना दिलेले मार्गदर्शन:शालेय जीवनात आदर्श व्यक्तिमत्त्व घडविण्याचे ध्येय ठेवा.कठोर परिश्रम, जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि विनम्रता यांचा समन्वय साधा.“शिकता शिकता शिकणं कधी सोडू नका!” हा मंत्र अंगीकारा.आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करा, शाळेचे, समाजाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करा.कृत्रिम सौंदर्यावर न भर देता सौंदर्य मनगुणांमध्ये असते हे लक्षात ठेवा.

माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार सांगून विद्यार्थ्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरित केले. मोबाईलचा शैक्षणिक कामासाठी निश्चित उपयोग करा . अतिवापर व्यक्तीमत्व विकासात अडसर ठरू शकतो ही जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली .
ताण तणाव मुक्त परीक्षा द्यावी . अपयश आले तर खचून जावू नका ती यशाची पहीली पायरी समजा . मोबाईलचा वापर कमी करा सल्ला दिला .प्रा लेकुरवाळे सरांचे विद्यार्थी महाराष्ट्र तसेच विविध क्षेत्रात प्रशासकीय , सामाजिक , शैक्षणिक , शेती , संरक्षण ( भूदल , नौदल , वायुदल ) क्षेत्रात उल्लेखनीय सेवा कार्य करीत आहे त्याबदल अभिमान व्यक्त केला .
विशेष उल्लेखनीय बाबी:विद्यालय १८ वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूलबस सेवा देत आहे, याचे प्रा. डॉ. जयंत लेकुरवाळे सरांनी कौतुक केले आणि महाराष्ट्रभर आपल्या व्याख्यानांमध्ये याचा उल्लेख करणार असल्याचे सांगितले.विशेष कार्यक्रम:कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दानशुर दाते तुकाराम रावजी चौधरी (सेवानिवृत्त प्रशिक्षित एस.टी. कामगार नेते, जळगाव) होते. इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भेट दिला, ज्याचे पूजन त्यांच्या शुभहस्ते पार पडले.तुकाराम रावजी चौधरी सरांनी प्रामाणिकपणा, शिस्त आणि उदार मनाने समाजसेवा करण्याच्या गुणांचे महत्व अध्यक्षीय मनोगतातून विद्यार्थ्यांना पटवून दिले.प्रमुख पाहुणे:

प्रमोद बाबुराव चौधरी (मूळगाव मांगी, ता. रावेर; ह.मु. भुसावळ; बांधकाम व्यावसायिक)
सुधीर बेंडाळे (भुसावळ, सुप्रसिद्ध “गोल्डन कन्स्ट्रक्शन”चे संचालक)नितीन पुरुषोत्तम चौधरी (फुलगाव, प्रगतीशील शेतकरी)गटशिक्षणाधिकारी विलास कोळी साहेब यांनी सहकुटुंब उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे योगदान:दी एज्युकेशन सोसायटी, थोरगव्हाण (स्थापना १९१७) चे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व समुह गीत गायन केले.सर्व मान्यवरांचा संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर शालेय समिती सदस्य मधुकर कोल्हे संचालक नंदकुमार चौधरी संचालक रविंद्र चौधरी यांचे शुभहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार व स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. त्यांची प्रमुख उपस्थिती लाभली .
विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. वैष्णव आणि पर्यवेक्षक डी. के. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक समितीने कार्यक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला.सांस्कृतिक समिती प्रमुख पी. सी. कचरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.विद्यार्थ्यांचे मनोगत:इयत्ता १० वी ममता पाटील (थोरगव्हाण) , मानसी पाटील (थोरगव्हाण ), प्रिया तायडे (चनवाडे ) , अंजली कुंभार (मांगी ) पूर्वजा पाटील (गाते) , प्रेरणा कोलते (गाते ) इयत्ता १२ वी सुरेखा कोळी तासखेडा , छाया बा म्हम्हंदे (तासखेडा ) , वैष्णवी इंगळे (तासखेडा ) या विद्यार्थ्यांनी शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करत शिक्षकांना श्रद्धेय अभिवादन केले.

निरोप घेतला व निरोप दिला .प्रमुख पाहुणे सुधीर गणेश बेंडाळे यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.बिल्डिंग कन्स्ट्रक्शन व्यवसायाचे महत्त्व सांगितले .संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी सामूहिक गीत घेतले, तर सचिव पवन चौधरी यांनी पालक , विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले व पालकांचे सहकार्याची अपेक्षा ठेवली आभार व्यक्त केले.संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत बाऊस्कर, शालेय समितीचे मधुकर कोल्हे, संचालक नंदकुमार चौधरी आणि रवींद्र चौधरी यांनी सर्व मान्यवरांचा सत्कार शुभहस्ते केला.विशेष आकर्षण:कलाशिक्षक एस. बी. सपकाळे यांनी दर्शनी फलक लेखन केले. शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष शिक्षक संतोष राणे सहसचिव विजय चौधरी सदस्य ठाकरे बंधु माता पालक सदस्य यांची उपस्थिती लाभली . दिल्लीस्थित शिक्षण घेत असलेला शाळेचा माजी विद्यार्थी रोहित कोळी (फोटोग्राफर) यांनी कार्यक्रमाचे छायाचित्रण मोफत करून आपले योगदान दिले.शालेय विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर कार्यक्रमाच्या आठवणी शेअर करण्यात आल्या.अतिथींसाठी खास खान्देशी भोजन:प्रमोद बाबुराव चौधरी (बिल्डर) यांनी खान्देशी स्वादिष्ट वरण-बट्टी आणि वांग्याची भाजी पुरवली. सर्वांनी याचा आस्वाद घेतला आणि तृप्तीचा ढेकर दिला!संवेदनशील आणि भावनिक क्षण:विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांचे आशीर्वाद घेतले, आठवणींचे फोटो काढले, सेल्फी काढण्याचा मोह आवरू शकला नाही!निरोप हा भावनिक, हृदयस्पर्शी क्षण होता, जिथे अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अश्रू आले.सुत्रसंचालन: सांस्कृतिक समिती प्रमुख पी. सी. कचरे यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले. समिती उपप्रमुख सौ . जयश्री चौधरी , समिती सदस्य एम के पाटील , एन बी चौधरी , सौ नयना पाटील , एस बी सपकाळे , के.एम पाटील , एस पी पाटील , एन ए देशमुख यांनी नियोजन केले व परिश्रम घेतले .शिक्षक बंधू-भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनमोल सहकार्य केले. शेवटची आठवण: विद्यार्थ्यांनी आपले शालेय जीवनातील सुखद आठवणी मनात कोरून ठेवत उज्ज्वल भविष्यासाठी वाटचाल सुरू करण्याचा संकल्प केला. “नवीन वाटा, नवीन दिशा” या मार्गावर चालत प्रत्येक विद्यार्थी उज्ज्वल भविष्यासाठी सज्ज व्हावा, हिच शुभेच्छा!”

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.