विद्यापीठाच्या क्रीडा संकुलाचा स्लॅब कोसळला, जागतिक दर्जाचा दावा फोल, विद्यार्थी थोडक्यात वाचले.

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा पुरवण्याचा दावा करणाऱ्या शारीरिक शिक्षण विभागाच्या कलिना येथील क्रीडा संकुलाचा सिमेंटचा स्लॅब कोसळला.मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या क्रीडा सुविधा पुरवण्याचा दावा करणाऱ्या शारीरिक शिक्षण विभागाच्या कलिना परिसरातील क्रीडा संकुलाची दुर्दशा पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. शनिवारी या क्रीडा संकुलात व्हॉलीबॉल स्पर्धेचा अंतिम सामना सुरू असताना सिमेंटचा स्लॅब कोसळला. खेळ थोड्या अंतरावर सुरू असल्याने खेळाडू बालंबाल बचावले. विद्यापीठ प्रशासनाने मात्र, ‘स्लॅब कोसळला नसून भिंतीवरील विटा खिळखिळ्या झाल्याने तो भाग पडला’ असे स्पष्टीकरण दिले आहे.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरातील शारीरिक शिक्षण विभागाच्या क्रीडा संकुलातील बंदिस्त संकुलात शनिवारी आंतरशालेय व कनिष्ठ महाविद्यालय व्हॉलीबॉल स्पर्धेचा अंतिम सामना सुरू होता. त्या वेळी या संकुलातील एका बाजूला असलेल्या भिंतीच्या छताजवळील स्लॅबचा काही भाग कोसळला. या वेळी या भिंतीजवळ कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. विशेष म्हणजे, या क्रीडा संकुलाच्या दुरवस्थेला ‘महाराष्ट्र टाइम्स’ने वेळोवेळी वाचा फोडली होती. या क्रीडा संकुलात असलेल्या बहुउद्देशीय सभागृहात मेपलवूड फ्लोअरिंग बसवण्यात आले होते. मात्र अनेक ठिकाणी या लाकडाच्या पट्ट्या उखडल्याने त्यांच्या जागी मेपलवूडऐवजी साध्या लाकडाच्या पट्ट्या लावण्यात आल्या होत्या. तसेच काही ठिकाणी भिंतींजवळील प्लास्टरही उखडले होते.शनिवारी या बहुउद्देशीय सभागृहाच्या कोपऱ्यातील भिंतीचा काही भाग कोसळला. या वेळी इथे सामना सुरू असल्याने विद्यार्थ्यांमध्ये एकच घबराट पसरली. मात्र या कोपऱ्यातील भागात प्रेक्षक किंवा खेळाडू नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या सभागृहात विद्यापीठस्तरीय अनेक स्पर्धा कायम सुरू असतात. त्यामुळे या बहुउद्देशीय सभागृहाचे स्ट्रक्चरल ऑडिट तातडीने झाले पाहिजे. तसेच जून-जुलै महिन्यात या सभागृहाची देखभाल-दुरुस्ती केलेल्या कंत्राटदारावर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी विद्यार्थी संघटना करत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.