विवरे येथे बेंडाळे हायस्कुलचा स्तुत्य उपक्रम निरोप समारंभ:शिक्षणामुळे व्यक्तिमत्त्व विकास होतो – श्रीमती नीलम पुराणिक .

शिक्षण विकास मंडळ विवरे संचलित श्री. ग. गो. बेंडाळे हायस्कूल, विवरे (ता. रावेर, जि. जळगाव) येथे इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. कमलाबाई सुंदरलाल अग्रवाल गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका व इ. १२ वीच्या केंद्र संचालिका श्रीमती नीलम पुराणिक उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे ज्येष्ठ शिक्षक शरद येवले सर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सरस्वती पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. इयत्ता ५ वी ते ९ वीतील विद्यार्थिनी अंतरा वाघोदे, गायत्री बेंडाळे व गायत्री तेली यांनी निरोपार्थी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांचे मनोगत आणि सन्मानइयत्ता १० वीचे विद्यार्थी कु. श्यामल चौधरी, कीर्ती पाटील, वैष्णवी मोहरकर, प्रिया गाढे, तनुश्री गाढे, खुशी महाजन व नम्रता सुरळकर यांनी आपल्या मनोगतातून शिक्षक व शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.


याप्रसंगी शिक्षण विकास मंडळ विवरेचे चेअरमन प्रा. शैलेश राणे, ज्येष्ठ संचालक धनजी लढे, संचालक दिलीप राणे, शाळेचे मुख्याध्यापक पी. एच. वायकोळे, सलाउद्दीन अबिद सर (अँग्लो उर्दू हायस्कूल, रावेर), सय्यद नूर सर (पर्यवेक्षक, अँग्लो उर्दू हायस्कूल, रावेर), व्ही. व्ही. पाटील (संचालक, भुसावल माध्यमिक पतपेढी), क्रीडा शिक्षक प्रा. जे. के. पाटील, तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. हर्षाली बेंडाळे उपस्थित होते.प्रेरणादायी मार्गदर्शन उपशिक्षिका निलिमा नेमाडे यांनी विद्यार्थ्यांना जीवनात कोणत्याही क्षेत्रात यश मिळवून स्वतःची ओळख निर्माण करण्याचा सल्ला दिला. प्रा. व्ही. व्ही. पाटील यांनी परीक्षेसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली, तर सलाउद्दीन सरांनी कष्ट, मेहनत व जिद्दीने पुढे जाण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका श्रीमती नीलम पुराणिक यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना सांगितले की, “शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. व्यक्तिमत्त्व विकासासाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे.” आदर्श विद्यार्थिनींचा गौरव शाळेतील इयत्ता दहावीच्या कु. श्यामल विश्वनाथ चौधरी व कु. तनुश्री चंद्रकांत गाढे यांना आदर्श विद्यार्थिनी म्हणून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन व समारोप कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कलाशिक्षक अर्जुन सोळुंके यांनी केले, तर आभार प्रदर्शन क्रीडा शिक्षिका तेजल भिरुड यांनी मानले. कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा आनंद घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक आर. टी. कोल्हे, सर्व शिक्षक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी तसेच कैलास राणे, तेजस पाचपांडे, देवेंद्र फेगडे व प्रतीक वारके यांचे सहकार्य लाभले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.