चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाही एक गावठी बनावटी कट्टा व 03 जिवंत काडतुस, मोटर सायकल सह एकुण 1,36,500/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत.

दि. 31/01/2025 रोजी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, शेषराव नितनवरे, यांनी गुप्तबातमीव्दारा मार्फत बातमी मिळाली की, लासुर ते हातेड रस्त्याने एक काळ्या रंगाची प्लसर गाडी क्रमांक एम एच 12 आर आर 6660 ही येत असुन त्यावरील दोन इसम हे बेकायदेशीररित्या अवैध्य गावठी बनावटी कट्टा व जिवंत काडतुस वाहतुक करुन घेवुन जात आहे .

अशी बातमी मिळाल्याने चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक, शेषराव नितनवरे, व पोलीस अंमलदार यांनी लासुर ते हातेड रोडवर पाटचारी जवळ सापळा लावुन दि. 31/01/2025 रोजी 06.44 वाजेचे सुमारास बजाज प्लसर गाडी क्रमांक एम एच 12 आर आर 6660 अशी येतांना दिसल्याने सदर मोटर सायकल चालकास हाताचा इशारा देवुन थांबविले असता त्यावरील चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव नौफील रब्बानी सैय्यद वय-22 वर्ष, रा. सैय्यद नगर हडपसर गल्ली नं 4(A), लिब्रा शाळेजवळ ता. जि. पुणे व त्यापाठीमागे बसलेल्या अजय अशोक वाघमारे वय-24 वर्ष, रा. सलगर ता. तुळजापुर, जि. उस्मानाबाद, ह. मु. नेवाळे वस्ती चिखली ता.हवेली जि.पुणे असे सांगितले त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचेकडे एक गावठी बनावटी कट्टा, 03 जिवंत काडतुस असे मिळुन आल्याने त्याना सदर गावठी बनावटी हत्यार व जिवंत काडतुस कब्जात बाळगण्याचा परवाना आहे काय बाबत विचारणा केली असता त्यांचेकडे परवाना नसल्याचे सांगितल्याने नौफील रब्बानी सैय्यद ,अजय अशोक वाघमारे यांचेकडुन एक गावठी बनावटी कट्टा, 03 जिवंत काडतुस, दोन मोबाईल फोन, 500/- रुपये रोख व बजाज प्लसर गाडी क्रमांक एम एच 12 आर आर 6660 असे एकुण 1,36,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक, शेषराव नितनवरे करत आहे .

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.