रायगडमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील प्रेमीयुगुलाचा तीन महिन्यांपूर्वी ब्रेकअप झाला होता. यामुळे संतप्त झालेल्या प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या कुटुंबीयांसमोर तिच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केले आणि स्वतःच्या गळ्यावर देखील वार करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.रायगडमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. येथील प्रेमीयुगुलाचा तीन महिन्यांपूर्वी ब्रेकअप झाला होता. यामुळे संतप्त झालेल्या प्रियकराने आपल्या प्रेयसीच्या कुटुंबीयांसमोर तिच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केले आणि स्वतःच्या गळ्यावर देखील वार करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पनवेल मधील सेक्टर अठरा येथे ही घटना घडली. या घटनेची नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी निकेश शिंदे आणि मृत तरुणी जागृती सत्वे यांच्यात गेल्या वर्षभरापासून प्रेम संबंध होते. ३ महिन्यांपूर्वी त्यांचा काही कारणास्तव ब्रेकअप झाला होता. ब्रेकअप झाल्यानंतर प्रेयसी दुसऱ्या मुलासोबत बोलत असल्याचा संशय प्रियकराला होता. निकेशच्या मनात संशयाने घर तयार केले. आणि संतापाच्या भरात निकेश शिंदे ३१ जानेवारीला प्रेयसी जागृती सत्वे हिच्या घरी गेला आणि दुसऱ्यासोबत संबंध ठेवू नकोस असे बोलून तिच्याशी वाद घातला. त्यानंतर त्याने तिला शिवीगाळ आणि मारहाण सुरु केली. यावेळी तिच्या घरी आई आणि तिची बहीण देखील होती.प्रियकर आरोपीने तरूणीच्या गळ्यावर चाकूने वार करत तिची हत्या केली आहे. या घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यानंतर स्वतःच्या हातावर आणि गळ्यावर देखील वार केले. पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या आरोपीवर एमजीएम हॉस्पिटल, कामोठे येथे उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर खान्देश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर पोलीस अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.









