भयंकर! ट्रक चालकाला बेदम मारहाण; अपहरण करुन धावत्या वाहनासमोर फेकलं; जागीच अंत, परिसरात खळबळ.

ट्रक चालकाचं अपहरण करुन हत्या करण्यात आली आहे. तमिळनाडूतील २४ वर्षीय चालकाचं कर्नाटकात अपहरण झालं. त्यानंतर त्याला एका धावत्या ट्रक खाली ढकलण्यात आलं. चालकाचा जागीच मृत्यू झाला.ट्रक चालकाचं अपहरण करुन हत्या करण्यात आली आहे. तमिळनाडूतील २४ वर्षीय चालकाचं कर्नाटकात अपहरण झालं. त्यानंतर त्याला एका धावत्या ट्रक खाली ढकलण्यात आलं. चालकाचा जागीच मृत्यू झाला. या भयंकर गुन्ह्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. बंगळुरु ग्रामीणमधील नेलामांगलाजवळ असणाऱ्या बूदीहल गावानजीक ही घटमा घडली.

२४ वर्षांचा सरबुद्दीन पेशानं ट्रक चालक होता. दिल्लीहून ट्रक घेऊन तो निघाला होता. त्यावेळी त्याच्यासोबत भूपती नावाचा आणखी एक चालक होता. ट्रकमध्ये इलेक्ट्ऱॉनिक वस्तू होत्या. सरबुद्दीन आणि भूपतीनं गुरुवारी रात्री महामार्गावर ट्रक थांबवला. दारु पिण्यासाठी दोघे एका हॉटेलवर गेले. तिथून त्यांनी जेवण घेतलं आणि त्यांनी ट्रक सुरु केला.सरबुद्दीन ट्रक चालवत होता, तर भूपती त्याच्या शेजारी बसला होता. त्यानं ट्रक मुख्य रस्त्यावर आणला. त्यावेळी त्याच रस्त्यावरुन दुचाकीस्वारांचा एक ग्रुप जात होता. त्यांचा सरबुद्दीन सोबत वाद झाला. सरबुद्दीन बेदरकारपणे ट्रक चालवत असल्यावरुन भांडण झालं. वाद वाढताच सरबुद्दीन खाली उतरला. दुचाकींवर असलेल्या तरुणांनी त्याला मारहाण केली.दुचाकीवर असलेल्या तरुणांनी सरबुद्दीनचं अपहरण केलं. त्यांनी त्याला दुचाकीवरुन १ किलोमीटर दूर केलं. तरुणांनी त्याला भररस्त्यात मारहाण केली. मग त्याला एका धावत्या ट्रकखाली ढकलून दिलं. ट्रकनं चिरडल्यानं सरबुद्दीन जागीच मरण पावला. सरबुद्दीनचं अपहरण करणाऱ्यांचा भूपतीनं पाठलाग केला. त्याला सरबुद्दीन मृतावस्थेत दिसला. त्यानंतर त्यानं याची माहिती पोलिसांना दिली.सरबुद्दीनच्या मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत. नेलामंगलाचे पोलीस उपअधीक्षक जगदिश यांच्या नेतृत्त्वात तपास करण्यात येत आहे. पोलिसांची विशेष पथकं सरबुद्दीनच्या खुन्यांचा शोध घेत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.