पारोळा तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक असलेल्या श्री.रविंद्र पाटील सर यांच्या आई सत्यभामा फाऊंडेशन संचलित टायगर इंटरनॅशनल स्कुलचा ६ वा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याप्रसंगी सपत्नीक उपस्थित राहण्याचा योग आला.यानिमित्त आयोजित “ओल्ड इज गोल्ड” चा उद्घाटन सोहळा पार पडला.

आपल्या पाल्यावर कोणतेही संस्कार हे इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या वयात होत असतात. या वयात मनावर कोरलेले संस्कार आयुष्यभर तसेच राहतात. श्री.रविंद्र पाटील सर यांनी अनेक कठीण प्रसंगांवर मात करत शितल अकॕडमीच्या माध्यमाने परदेशात मजल मारली. विद्यार्थ्यांसाठी कठीण असलेले इंग्लिश हे शितल अकॕडमीच्या माध्यमाने अगदी सोपे करून दिले. सर्वसामान्य कुटुंबातुन जन्म घेतलेल्या रविंद्र पाटील सरांनी शैक्षणिक क्षेत्रात संपादन केलेले यश हे अगदी अभिमानास्पद आहे, त्यांचे कौतिक करावे तेवढे थोडेच… आज या बालगोपालांचा सुंदर अशा कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन सपत्नीक आमंत्रित केले, सत्कार करून सन्मानीत केले, त्याबद्दल आयोजकांचे आभार मानले.प्रसंगी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैद्यकीय, पत्रकारिता, शासकीय यासह अन्य क्षेत्रातील मान्यवर, पालक, टायगर इंटरनॅशनल स्कुलचे शिक्षक-शिक्षकेत्तर वृंद, बालगोपाल उपस्थित होते.









