पिकअप वाहनाची दुचाकीला जबर धडक : तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू.

कॉलेज मधून टहाकळी येथे जाण्यासाठी निघालेल्या एका तरुणाचा दुचाकीच्या भीषण अपघातात उपचारादरम्यान शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजता मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एकुलता एक मुलगा गेल्याने नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता. या संदर्भात जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. महेश संजय पाटील (वय-१८), रा. टहाकळी ता. धरणगाव असे मयत झालेल्या महाविद्यालयीन तरुणाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील टहाकळी या गावात महेश हा आपले आई-वडील आणि मोठी बहीण यांच्यासोबत वास्तव्याला होता.

तो पाळधी येथील नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी अर्थात एनएमकेसी या महाविद्यालयात डिप्लोमा करत होता. गुरुवारी २३ जानेवारी रोजी दुपारी कॉलेज सुटल्यानंतर महेश हा घरी जाण्यासाठी पायी निघाला होता. त्याचवेळी त्यांच्या गावात राहणारे प्रभाकर नामदेव पाटील (वय-४२) हे देखील कंपनीतून घरी जाण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी रस्त्यामध्ये महेश भेटल्यावर त्याला देखील दुचाकीवर बसवून घेतले. राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या बोगद्यातून जात असताना अज्ञात बोलेरो पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला समोर जोरदार धडक दिली.

या धडकेत महेश हा गंभीर जखमी झाला, त्याला तातडीने जळगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी ३१ जानेवारी रोजी पहाटे ३ वाजता प्राणज्योत मालविली. दरम्यान एकुलता एक मुलगा केल्याने नातेवाईकांनी आक्रोश केला होता. या घटनेबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत महेशच्या पश्चात आई छायाबाई, वडील आणि मोठी बहीण असा परिवार आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.