दोन कार समोरासमोर धडकल्या, तिघांचा जीव गेला; बीडच्या भीषण अपघातात सरपंचाने मोठा भाऊ गमावला.

 बीडमध्ये दोन कार एकमेकांवर धडकल्या असून भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दिंद्रुडचे सरपंच यांच्या मोठ्या भावाचाही समवेश आहे.बीड येथे दोन कारची धडक होऊन एक भीषण अपघात घडला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अंबाजोगाई-केज मार्गावरील चंदनसावरगाव येथे हा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. या घटनेने काही काळ मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.अंबाजोगाई-केज मार्गावरील चंदनसावरगाव नजीक शुक्रवारी (३१ जानेवारी) रात्री १०.४५ च्या सुमारास दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. मृतांमध्ये अमित दिलीपराव कोमटवार (वय ३५, रा. दिंद्रुड, माजलगाव) यांचा समावेश आहे.

अपघातातील कार क्रमांक (एम एच-२३/ई ६८५२) आणि (एम एच-१२/एम डब्ल्यू-३५६३) या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. वाहन चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या अपघातात अमित कोमटवार आणि बीड येथील दोघांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अमित कोमटवार हे दिंद्रुडचे सरपंच अजय कोमटवार यांचे ज्येष्ठ बंधू होते.शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अचानक मोठा आवाज झाला. आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तेव्हा तिथे ही दोन वाहनं एकमेकांना धडकलेली दिसली.

ही धडक इतरी जबर होती की दोन्ही गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. अपघाताचे फोटो पाहून हा अपघात किती भीषण होता हे दिसून येते.युसुफवडगाव पोलीस ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांना माहिती मिळताच, त्यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार शेंडगे, हेडकॉन्स्टेबल पठाण, हेडकॉन्स्टेबल वारे घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. जखमी व्यक्तीला पुढील उपचारासाठी लातूर येथे हलवण्यात आले असल्याचे समजते. तर, याघटनेत तिघांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमधून एकच हळहळ व्यक्त होत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.