मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय वाल्मिक कराडवर गंभीर आरोप करण्यात आली आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल स्पष्ट भूमिका मांडली आहे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्याविषयी पाठराखण केली आहे.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर गंभीर आरोप केली जात आहेत. या हत्येतील एक आरोपी अजूनही फरार आहे. इतर आरोपींची चाैकशी सुरू आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर या प्रकरणात गंभीर आरोप झाली आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड हा काही दिवस फरार होता आणि त्यानंतर त्याने पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात आत्मसर्मपण केले. आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.










