निरोप समारंभ प्रसंगी प्रा डॉ जयंत लेकुरवाळे यांचे व्याख्यान: विद्यार्थी पालक यांचे साठी विचारांची मेजवाणी: अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांचे मत .थोरगव्हाण ता रावेर येथे १ फेब्रुवारी सकाळी 10.30 वाजता दहावी बारावी विद्यार्थ्यांना निरोप प्रसंगी नवी दिशा नवीन वाटा या विषयावर वक्ते प्रा डॉ . जयंत लेकुरवाळे विद्यार्थी कल्याण विभाग कबचौ उमवीद्यापीठ जळगांव डी एस देशमुख विद्यालय थोरगव्हाण ता रावेर येथे मार्गदर्शन करणार आहेत . इयत्ता दहावी बारावी सर्व विद्यार्थी पालकांना निमंत्रण देण्यात आले आहे . कार्यक्रमाचे अध्यक्ष तुकाराम रावजी चौधरी सेवानिवृत्त प्रशिक्षित एस.टी कामगार नेते सामाजिक कार्यकर्ते जळगांव आहेत .
प्रमुख पाहुणे भुसावळ येथील बांधकाम व्यावसायीक प्रमोद बाबुराव चौधरी , सुधीर गणेश बेंडाळे मान्यवर आहेत.द एजुकेशन सोसायटी थोरगव्हाण यांचे तर्फे अभिनव उपक्रम देशमुख माध्यमिक उच्च माध्य . विद्यालय येथे संपन्न होण्यासाठी नियोजन सांस्कृतिक समितीने केले आहे .सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत .









