ते आमदारही आमच्या संपर्कात होते, पण आम्ही भाजपला..; शिंदेंनी मोठा धमाका करण्याची संधी सोडली?

दिल्ली विधानसभा निवडणुकीची रंगत वाढली आहे. दिल्लीत ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. ८ डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. विधानसभा निवडणुकीचा प्रचार तापलेला असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सनसनाटी दावा केला आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीची रंगत वाढली आहे. दिल्लीत ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. ८ डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर होईल. विधानसभा निवडणुकीचा प्रचार तापलेला असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सनसनाटी दावा केला आहे. दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाचे आमदार शिवसेनेच्या संपर्कात होते. पण मतांचं विभाजन टाळण्यासाठी आम्ही विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. कारण शिवसेनें भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याची घोषणा केलेली आहे, असं शिंदे म्हणाले.भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी लवकरच दिल्लीला जाणार असल्याचं शिंदे म्हणाले. ‘आम आदमी पक्षाच्या विद्यमान आमदारांनी आमच्याशी संपर्क साधला होता. पण आमची भाजपसोबत युती आहे. शिवसेना आणि भाजपची विचारसरणी सारखीच आहे. मतांचं विभाजन टाळण्यासाठी आम्ही उमेदवार दिले नाहीत. कारण त्याचा फायदा विरोधकांना झाला असता. आम्ही दिल्लीला पूर्ण पाठिंबा दिला आहे,’ असं उपमुख्यमंत्री म्हणाले.शिवसेना अन्य राज्यांमध्ये कधी विस्तारणार, असा प्रश्न शिंदेंना विचारण्यात आला. त्यावर राजस्थानात आमचे ३ आमदार आहेत. अन्य राज्यांमध्ये जनाधार वाढवण्याचा आमचा मानस आहे, असं उत्तर शिंदेंनी दिलं. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपा पाठिंबा देत असल्याचं शिंदेंनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पाठवलं होतं. दिल्ली विधानसभा निवडणुकीत शिवसेना भाजपला पूर्ण पाठिंबा देईल आणि दिल्लीतील शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपच्या साथीनं प्रचार करतील, असं शिंदेंनी पत्रात नमूद केलं होतं.विशेष म्हणजे राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस दिल्लीत स्वबळावर विधानसभा निवडणूक लढत आहे. राष्ट्रवादीनं ३० उमेदवार दिले आहेत. त्यातील १३ जण अल्पसंख्याक समाजातील आहेत. महायुतीचा घटकपक्ष असलेल्या रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियादेखील दिल्लीत काही जागा लढवत आहे. दिल्लीत आम आदमी पक्ष विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा थेट मुकाबला होत आहे. दिल्लीत नोव्हेंबर २०१३ पासून आपची सत्ता आहे. आपचे संयोजक अरविंद केजरीवाल तीनवेळा मुख्यमंत्री झाले आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.