शिवसेना कॉर्पोरेट झालीये; आणखी एका नाराज नेत्याने साथ सोडली, नांदेडमध्ये ठाकरे गटाला खिंडार.

नांदेडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. येथे आणखी एका नेत्याने ठाकरेंची साथ सोडली आहे. आता शिवसेना कॉर्पोरेट झाली आहे असं म्हणत त्यांनी शिवसेना उध्दव ठाकरे गटाला राम राम केला. विधानसभा निवडणुकीनंतर अनेकजण शिवसेना उद्धव ठाकरे गटाची साथ सोडत आहेत. नांदेडमध्ये ही ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे. एका पाठोपाठ एक पदाधिकारी सोडचिठ्ठी देत आहेत. नांदेडमध्ये शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसला आहे. शिवसेनेचे नांदेड लोकसभेचे सहसंपर्क प्रमुख डॉ. मनोजराज भंडारी यांनी पक्षाला सोडचिट्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शिवसेनेत बिजसेन सुरु झालं आहे. निष्ठावंताना न्याय दिला जातं नाहीये, असा आरोप भंडारी यांनी केलाय.

डॉ. मनोजराज भंडारी हे निष्ठावंत शिवसैनिक अस ओळखले जायायचे मागील ४० वर्षांपासून म्हणजेच १९८५ पासून ते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत होते. विविध पदावर राहून पक्ष वाढीचे कार्य देखील केले. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी ते इच्छुक होते. नांदेड उत्तर मधून उमेदवारी मिळावी यासाठी त्यांनी पक्षाच्या नेत्यांकडे मागणी केली होती, मात्र पक्षांकडून उपऱ्या उमेदवाराला बी फॉर्म देण्यात आले. त्यामुळे निष्ठावंत शिवसैनिक नाराज झाले होते. याच नाराजीतून लोकसभा सहसंपर्क प्रमुख डॉ मनोजराज भंडारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. विशेष म्हणजे काही दिवसा पूर्वी जिल्हाध्यक्ष पदावर असलेले माधव पावडे, शहराध्यक्ष पप्पू जाधव, राज्य संघटक एकनाथ पवार यांच्या सह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यातच भंडारी यांनी देखील साथ सोडल्याने नांदेडमध्ये शिवसेना ठाकरे गटाची पडझड झाल्याच चित्र पहायला मिळत आहे.लोकसभा सहसंपर्क प्रमुख मनोजराज भंडारी यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावबकुळे यांच्या उपस्थितीत भंडारी यानी भाजप मध्ये प्रवेश केला आहे.पक्ष प्रवेशानंतर भंडारी यांनी शिवसेनेवर आरोप देखील केले. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण अस शिवसेनेचे धोरण होते, पण आता पक्षात ८० टक्के राजकारण आणि २० टक्के समाजकारण अस सुरु आहे. शिवसेना कॉर्पोरेट झाली आहे, बिसनेस सुरु आहे. हिंदुत्व मुद्दा देखील बाजूला पडला आहे अस भंडारी म्हणाले.शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेले डॉ मनोजराज भंडारी यांचे पक्ष प्रवेशानंतर नांदेडमध्ये आगमन झाले. यावेळी त्यांचा नांदेडच्या रेल्वे स्टेशन येथे स्वागत करण्यात आले. दरम्यान भाजपमध्ये प्रवेश करतात त्यांना प्रदेश सह संयोजक पदी निवड देखील करण्यात आली आहे. पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचे ते म्हणाले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.