काँग्रेस खासदाराला पळवून पळवून मारलं, पोलिसांसमोर डोकं फोडलं; लाठाकाठ्यांनी बेदम मारहाण.

बिहारमधील काँग्रेस खासदारावर जमावाने प्राणघातक हल्ला केला आहे. बिहारमधील सासारामचे खासदार मनोज राम यांना कैमूरच्या मोहनिया येथे हल्ला करण्यात आला. स्कूल बस चालकाला मारहाण केल्याने उफाळलेल्या वादातून ही घटना घडली आहे.बिहारमधील काँग्रेस खासदारावर जमावाने प्राणघातक हल्ला केला आहे. बिहारमधील सासारामचे खासदार मनोज राम यांना कैमूरच्या मोहनिया येथे हल्ला करण्यात आला. ही घटना त्यांच्याच भावाच्या सेंट जॉन इंटरनॅशनल शाळेजवळ घडली आहे. PACS निवडणुकीनंतर निघालेल्या मिरवणुकीतील लोक आणि स्कूल बसचा चालक यांच्यात हाणामारी झाली होती. यादरम्यान मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या खासदाराला जमावाने घेरले आणि त्यांना मारहाण करुन जखमी केले. यामध्ये खासदाराच्या डोक्याला दुखापत झाली आहे. यानंतर त्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले आणि शाळकरी मुलांना सुखरूप घरी सोडण्यात आले.

बिहारच्या कुद्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाथोपूर गावाजवळ ही घटना घडली आहे. सासारामचे खासदार मनोज राम यांचे बंधू मृत्युंजय भारती हे सेंट जॉन इंटरनॅशनल शाळेचे मालक आहेत. तर घडले असे की, PACS निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर विजयी मिरवणूक काढण्यात आली. यादरम्यान स्कूल बस चालक आणि मिरवणुकीत सहभागी असलेल्या काही लोकांमध्ये बाचाबाची झाली आणि वाद उफाळला. या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. इतक्यात त्या हाणामारीत खासदार मनोज कुमार यांनी मध्यस्थी केली. त्यांनी लोकांना समजवले आणि वातावरण शांत केले त्यानंतर मिरवणूक पुन्हा रवाना झाली. मात्र थोड्या वेळानंतर ८ ते १० जणांचा जमाव काठ्या आणि भाले घेऊन पुन्हा शाळेत पोहोचले आणि वाद घातला. यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. खासदार मनोज कुमार पुन्हा त्यांना शांत करण्यासाठी गेले, मात्र यावेळी हे त्यांच्या अंगलट आली. त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला ज्यामध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे.याप्रकरणी खासदार कुमारांचे भाऊ मृत्युंजय भारती यांनी सांगितले की, मतमोजणीचे निकाल आल्यानंतर लोक मिरवणूक काढत होते. यामुळे काही लोक गैरवर्तन करू लागले. आमच्या बस चालकाला मारहाण करण्यात आली. खासदार आल्यावर त्यांनी कसं तरी समजावून सांगून इथून लोकांना परत पाठवले. त्यानंतर आठ-दहा जण काठ्या, भाले घेऊन शाळेजवळ आले आणि गैरवर्तन करू लागले. खासदार समजावण्यास गेले असता त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्याचे डोके फुटले आहे.मोहनियाचे डीएसपी प्रदीप कुमार यांनी सांगितले की, भरिगांवा येथील लोकांशी विद्यालयासंदर्भात वाद सुरू होता. हा वाद वाढला आणि हाणामारी सुरु झाली. यामध्ये खासदारांसह अर्धा डझनहून अधिक लोक जखमी झाले आहेत. खासदारांवर सध्या उपचार सुरू आहेत. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी एसपींसह मोठ्या प्रमाणात फौजफाटा तेथे तैनात आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून घटनास्थळी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिसांकडे घटनेचे व्हिडीओ फुटेजही हाती लागले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.