वरुन धडे अन् बायकोच्या बॉसच्या गाडीत बॉम्ब ब्लास्ट, प्रकरणाने पोलिसही चक्रावले.

एका सॉफ्टवेअर इंजिनिअरने आपल्या बायकोच्या बॉसच्या कारमध्ये बॉम्बस्फोट केला. यामध्ये मालकाच्या कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्याने असं का केलं हे ऐकून सार्यांनाच धक्का बसला आहे.सॉफ्टवेअर इंजिनिअरला त्याच्या पत्नीचे एका बिल्डरसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. या संशयामुळे त्याने जे केलं याने पोलिसही चक्रावले आहे. या सॉफ्टवेअर अंजिनिअरने थेट यूट्यूबवरून बॉम्ब कसा बनवायचा हे शिकून घेतलं. त्यानंतर बॅटरी रिमोटचा वापर करुन त्याने बिल्डरच्या डस्टर कारमध्ये स्फोट केला. याप्रकरणी पोलिसांनी सॉफ्टवेअर इंजिनीअरला अटक केली आहे. यावेळी दुर्ग एसपी म्हणाले की, कारमध्ये स्फोट घडवणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. ही घटना छत्तीसगडमधील भिलाई येथील असल्याची माहिती आहे.


जवाहर नगर भिलाई येथील रहिवासी संजय बुंदेला यांनी पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की, कौशल बिल्डकॉन नावाचे त्याचे कार्यालय आहे, त्यासमोर त्यांची डस्टर कार उभी होती. यादरम्यान त्यांच्या गाडीत अचानक स्फोट होऊन गाडीचं नुकसान झालं. याप्रकरणी सुपेला चौकी स्मृतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला.पोलिसांनी घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही स्कॅन केले. फुटेजमध्ये संशयिताची उंची आणि शरीरयष्टी कौशल बिल्डकॉन कार्यालयात काम करणाऱ्या असिस्टंट मॅनेजरच्या पती देवेंद्र सिंग यांच्याशी मिळतीजुळती असल्याचे दिसून आले. त्यामुळे पोलिसांनी संशयाच्या आधारे देवेंद्र सिंगला पकडले आणि त्याची चौकशी सुरू केली. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता देवेंद्रने सारा कारनामा सांगितला.चौकशीत त्याने सांगितलं की, पत्नीचे बांधकाम व्यावसायिक संजय बुंदेला याच्याशी अवैध संबंध असल्याच्या संशयावरून त्याने ही घटना घडवून आणली. त्याने मोबाईल फ्लॅश टॅग ॲप डाऊनलोड करून पत्नीच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल केला होता. बिल्डरला घाबरवण्यासाठी त्याने हा स्फोट घडवून आणला.आरोपी देवेंद्रने सांगितले की, त्याने यूट्यूब पाहिल्यानंतर बॉम्ब बनवला, ज्यामध्ये त्याने त्याच्या मुलांच्या खेळण्यांचा रिमोट वापरला. यानंतर त्याने तो डस्टर कारमध्ये लावला आणि स्फोट घडवून आणला. याप्रकरणी स्मृतीनगर पोलिसांनी आरोपी देवेंद्र याला अटक करून न्यायालयात हजर केले, तेथून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.याप्रकरणी, एसपी जितेंद्र शुक्ला यांनी सांगितले की, आम्हाला कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळाली होती. पोलिसांनी तत्काळ एफएसएल पथकासह तपास सुरू केला. त्यावेळी आम्हाला असं लक्षात आलं की यामध्ये साधारण फटाक्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या गनपावडरचा वापर करण्यात आला होता. कार मालकाकडून माहिती घेऊन तपास केला असता आरोपी पकडला गेला. टायगर बॉम्बचा दारुगोळा, मुलांच्या खेळण्यातील बॅटरी आणि रिमोट वापर केला. बॉक्समध्ये बंद करून स्फोट केला. त्याला पत्नीचे प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. आरोपी सॉफ्टवेअर अभियंता आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.