आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडवण्याबाबत आदिवासी विकास मंत्र्यांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे निवेदन.

नाशिक – आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध समस्या आणि तक्रारीबाबत राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी आज निवेदन दिले. आदिवासी मंत्र्यांशी याप्रकरणी लकीभाऊ जाधव यांनी सकारात्मक चर्चा केली.

व्यक्तिगत लक्ष घालून लवकरच या सर्व समस्या सोडविणार असल्याचे आश्वासन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी लकीभाऊ जाधव यांना दिले. आदिवासी वसतीगृहातील विद्यार्थ्यांच्या आहाराच्या डीबीटीमध्ये वाढ करावी किंवा डीबीटी पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणे खानावळ सुरू करावी. तालुका, जिल्हास्तरावर आदिवासी मुला/ मुलांच्या वसतिगृहांची संख्या वाढवावी. पं. दीनदयाळ स्वयंम योजनेत महागाईच्या दृष्टीने वाढ करावी. ह्या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील सर्व कॉलेजच्या आदिवासी विद्यार्थ्याना लागू करावा. 2023-2024 चे ह्या योजनेचे प्रलंबित असणारे पूर्ण पैसे विद्यार्थ्यांना तत्काळ मिळावे. 2024-2025 चा एकच हप्ता मिळाला असून सर्व पैसे विद्यार्थ्याना तत्काळ द्यावेत. TRTI च्या माध्यमातून पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण, स्पर्धा परीक्षेसाठी राज्यभरातील काही प्रशिक्षण केंद्र विद्यार्थ्यांना चांगले प्रशिक्षण देत नाही. विद्यार्थ्यांच्या खूप तक्रारी येत असल्याने अशा खाजगी प्रशिक्षण केंद्राला दिलेली योजना बंद करून चांगल्या प्रशिक्षण केंद्रांची निवड करावी. प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्याना अजून अनुपलब्ध निधी तात्काळ मिळावा. आश्रमशाळामधील इ 1 ली ते 4 थी चे वर्ग बंद करू नये आदी मागण्या लकीभाऊ जाधव यांनी मांडल्या. आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्व प्रश्न सोडवणार असल्याचे लकीभाऊ जाधव यांना सांगितले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.