ऑरगॅनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची साखळी तयार करणार – जयंत पाटील

ऑरगॅनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची साखळी तयार करणार – जयंत पाटील

गावागावात ऑरगॅनिक शेती करणाऱ्या शेतकऱ्याची साखळी तयार करण्यात येणार आहे. त्यातुन त्यांच्या उत्पादीत शेत मालाच्या विक्रीसाठी ग्रामिण भागातील युवकांची साखळी तयार करण्यात येणार असल्याची माहिती रूरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडीयाचे जिल्हाध्यक्ष जयंत पाटील यांनी मंगळवार, २८ जानेवारी रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. नागपुरच्या ऑरेंज सिटी लिसेस प्रा. लि. व रूरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडीया यांच्या सहकार्याने हा प्रकल्प जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
शेतीचे शाश्वत उत्पन्न वाढवून देणारे जैविक खते आणि जैव-कीटकनाशक यांचे उत्पादन ऑरेंज सिटी लिसेस प्रा. लि.ने केले आहे. त्यास पेटंटही मिळालेले आहे. हे पेटंटेड उत्पादन शेतकर्यांच्या सेवेसाठी व सर्वांगीण विकासासाठी गावागावात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. असल्याचे रुलर चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडियाचे जळगाव जिल्हाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या आत्महत्यां मागे पिकाला मिळणारा कमी भाव आणि खतांच्या वाढत्या किमती आहेत. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन ऑरेंज सिटी आणि रुलर चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया ने गावापर्यंत आणि कमी खर्चात चांगली शेती चांगलं उत्पादन घेता येतील, या साठी उत्पादने विकसित केले आहेत. हे उत्पादन चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थे मार्फत चालवण्यात आलेल्या गावा गावातील घराघरात ओरगॅनीक शेती या चळवळीतून पोहचवणार आहेत. यातून उत्पादीत मालाच्या विक्रीसाठी ग्रामिण भागातील युवकांचीही एक साखळी तयार करण्यात येणार आहे. यावेळी ऑरेंज सिटी लिसेस प्रा. लि. चे डॉ. संजय देशमुख, यशपाल पुणेकर उपस्थित होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.