जिल्हाधिकाऱ्यांनी महिन्यातून एकदा व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी दोन वेळा आपल्या क्षेत्रात दौरा करून आपल्या विभागातील शासकीय ध्येयधोरणे व योजना जनतेपर्यंत पोहोचतात की नाही, याचा वस्तुनिष्ठ अहवाल द्यावा, असे निर्देश बावनकुळे यांनी त्यात दिले आहेत.राज्यातील महसूल यंत्रणा लोकाभिमुख करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परिपत्रक प्रसृत केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी महिन्यातून एकदा व उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांनी दोन वेळा आपल्या क्षेत्रात दौरा करून आपल्या विभागातील शासकीय ध्येयधोरणे व योजना जनतेपर्यंत पोहोचतात की नाही, याचा वस्तुनिष्ठ अहवाल द्यावा, असे निर्देश बावनकुळे यांनी त्यात दिले आहेत. या कामात कुचराई केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असेही बजावण्यात आले आहेत.










