26 जानेवारी 2025 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद मेडसांगवे तालुका मुक्ताईनगर येथे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नवीन कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .

तसेच शालेय विद्यार्थ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे राज्य सचिव अमोल भिसे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना पुस्तके वह्या शालेय वस्तू महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष विनोद भाऊ पाटील यांच्या हस्ते शालेय वस्तू वाटप करण्यात आले यावेळेस जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक निलेश पावरा व वसावे सर पोलीस पाटील व गावाचे ग्रामस्थ मंडळी ध्वजारोहणासाठी उपस्थित होती









