डॉक्टरचं अपहरण, ६ कोटींची खंडणी मागितली; मग ३०० रुपये देऊन सोडलं; चक्रावून टाकणारं प्रकरण.

 कर्नाटकच्या बेल्लारीत एका पीडियाट्रिक डॉक्टरचं अपहरण करण्यात आलं. कारमधून आलेल्या काही अज्ञातांनी डॉक्टरांना जबरदस्तीनं कारमध्ये बसवलं. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्याच्या भावाकडून ६ कोटी रुपयांची मागणी केली.कर्नाटकच्या बेल्लारीत एका पीडियाट्रिक डॉक्टरचं अपहरण करण्यात आलं. कारमधून आलेल्या काही अज्ञातांनी डॉक्टरांना जबरदस्तीनं कारमध्ये बसवलं. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी त्याच्या भावाकडून ६ कोटी रुपयांची मागणी केली. यानंतर पोलिसांनी संपर्ण परिसरात नाकाबंदी लावली. अपहकरणकर्त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी सूत्रं फिरवली. अखेर १४ तासांनंतर अपहरणकर्त्यांनी डॉक्टरांना सोडून दिलं. विशेष म्हणजे अपहरणकर्त्यांनी डॉक्टरांना बसच्या तिकिटासाठी ३०० रुपये स्वत:च्या खिशातून दिले.

कर्नाटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेल्लारी जिल्हा रुग्णालयातील शिशुरोगतज्ज्ञ डॉ. सुनील शनिवारी सकाळी वॉकसाठी बाहेर पडले होते. सकाळी सहाच्या सुमारास सूर्य नारायणपेठेतील शानेश्वर मंदिराजवळ टाटा इंडिकामधून आलेल्या अज्ञातांनी त्यांनी जबरदस्तीनं कारमध्ये बसवलं. काही वेळानंतर अपहरणकर्त्यांनी डॉ. सुनील यांचे भाऊ वेणुगोपाल गुप्ता यांना व्हॉट्स ऍप कॉल करुन ६ कोटी रुपयांची खंडणी मागितली. भावाच्या सुटकेसाठी ३ कोटींची रोकड आणि ३ कोटीच्या सोन्याचा बंदोबस्त कर, अशी धमकीच अपहरणकर्त्यांनी दिली.वेणुगोपाल गुप्ता जिल्ह्यातील मद्य डीलर्सच्या असोसिएशनचे अध्यक्षदेखील आहेत. त्यांनी भावाच्या अपहरणाची माहिती पोलिसांना तातडीनं दिली. अपहरणाची घटना सीसीटीव्हीत कैद झालेली होती. त्यानंतर पोलिसांनी डॉक्टरांच्या सुटकेसाठी वेगवान हालचाली सुरु केल्या. जिल्ह्यातून बाहेर जाणाऱ्या सगळ्या रस्त्यांवर नाकाबंदी लावण्यात आली. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास अपहरणकर्त्यांनी डॉक्टरांना एका निर्जन रस्त्यावर सोडलं. त्यांना कारमधून उतरवताना अपहरणकर्त्यांनी हातावर बसच्या तिकिटासाठी ३०० रुपये टेकवले.अपहरणाच्या घटनेमुळे डॉ. सुनील यांना मानसिक धक्का बसला आहे. अपहरणकर्त्यांना पकडण्यासाठी पोलिसांचं अभियान सुरु आहे. या अपहरणाचा संबंध त्यांचे भाऊ वेणुगोपाल यांच्या मद्य व्यवसायाशी असल्याचा संशय पोलिसांना आहे. व्यवसायिक शत्रुत्वातून, बदला घेण्यासाठी डॉ. सुनील यांना लक्ष्य करण्यात आल्याची शंका पोलिसांना आहे. त्या दृष्टीनं पोलिसांचा तपास सुरु आहे.अपहरणानंतर पोलिसांनी वेगानं चक्रं फिरवत अनेक ठिकाणी नाकाबंदी लावल्यानं अपहरणकर्त्यांनी डॉ. सुनील यांची सुटका केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. डॉ. सुनील सुखरुप असले तरीही त्यांच्या एकाही अपहरणकर्त्याला पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आलेलं नाही.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.