भारतीय प्रजासत्ताक दिना निमित्ताने आज दिनांक 26 जानेवारी रोजी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सिव्हिल हॉस्पिटल, *मा.ना.गिरीश भाऊ महाजन, मा. खा. स्मिताताई वाघ ,मा.आ.राजूमामा भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, डॉक्टर गौरव प्रकाश महाजन वैद्यकीय आघाडी अध्यक्ष.जिल्हाध्यक्षा अल्पसंख्याक मोर्चा नूर मोहम्मद यांच्या मार्गदर्शनात गरजू रुग्णांना भाजपा *अल्पसंख्याक युवा मोर्चा च्या वतीने फळे वाटप करण्यात आली.
याप्रसंगी अल्पसंख्याक युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अश्फाक मुनाफ खाटीक, *सोशल मीडिया संयोजक धीरज वर्मा,सरचिटणीस जावेद खाटीक,सरचिटणीस मोहसीन शाह, इरफान भाई शेख, वसीम कुरेशी, शाहिद मजीद शेख, व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते…









