उद्योगाप्रति व आरोग्याप्रति महिलांनी जागरूक राहणे ही काळजी गरज.- हळदी कुंकु कार्यक्रमात प्रसिध्द मोटीवेटर व उद्योजक तानाजी शेटे यांचे मत.विश्वकर्मा वंशीय समाज संघटन महिला आघाडी तर्फे हळदी कुंकवाचा कार्यक्रम 26 जानेवारी रोजी राधाकृष्ण विद्यालय जयभवानीनगर या ठिकाणी पार पडला.या कार्यक्रमाप्रसंगी भाजपा महिला अध्यक्ष मनीषाताई मुंडे, मराठवाडा विश्वकर्माचे समाज संघटनेच्या विभागीय अध्यक्ष सौ वनिताताई चाफेकर, विधीतज्ञ सौ शिल्पाताई शेरखाने, शिवसेना नेत्या सुकण्याताई भोसले यांची उपस्थीती होती. ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक सक्षम स्त्री बनवणे, गृहिणी मध्ये आत्मविश्वास वाढवून त्यांना उद्योगाप्रति, आरोग्याप्रती जागरूक करने ही काळाची गरज आहे. सिक्रोमेक या कंपनी द्वारे महिला गृहउद्योग करू शकतील अश्या विविध मशनारी तयार केली जातात.
बचत गट, शासनाच्या विवीध स्कीम च्या माध्यमातून त्या महिलांनी खरेदी करूण स्वताला उद्योजिका बनवू शकतात असे महिला सोबत संवाद साधताना प्रसिद्ध उद्योजक तानाजी शेटे सर यांनी नमूद केले.ह्या कार्यक्रमातून महिलांची उन्नती होईल या करिता आयोजिक महिलांचे त्यांनी भरभरून कौतुक केले.आमदार तथा मंत्री सौ मेघना ताई बोर्डीकर यांच्या सहकारी विश्वकर्मा वंशीय समाज संघटन विभागीय अध्यक्ष सौ वनिता ताई यांनी महिलांनी राजकारणात येऊन समृध्द परिवार बनवण्याचे आव्हान केले तर भाजपा महीला आघाडी जिल्हा अध्यक्ष सौ मनीषा मुंडे यांनी आरोग्य जपत आपला संसार करा. रोज व्यायाम करणे आवश्यक असल्याचे सांगीतले.
या कार्यक्रमात संगीत खुर्ची, होम मिनिस्टर, विवीध अतरंगी खेळ घेण्यात आले त्याचे संयोजन लाडके भाऊजी संतोष भांडेकर यांनी केले तर सूत्रसंचालन विलास पवार यांनी केले.
या कार्यक्रमाकरिता पूजा भालेकर, अनिता राऊत, दिपाली सपकाळ, प्रमिला सोनवणे,मंदा खोलगडे ,पूजा गाडेकर, रूपाली हिवाळे, दिपाली पांचाळ, लक्ष्मी कामोदे, पद्मावती पांचाळ, सुरेखा भांडेकर, गीता घुसळकर सुरेखा सोनवणे व वैष्णवी राऊत यांनी केले.









