जळगावात भरधाव बुलेटस्वारकाने प्रौढाला उडविले, जागीच मृत्यू.

जळगाव शहरांमध्ये होणाऱ्या अपघाताच्या घटना काही थांबताना दिसत नसून शनिवारी भरधाव डंपरने विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. या घटनेला काही तास उलटत नाही तोच पुन्हा एकदा भरधाव जाणाऱ्या व बेफाम बुलेट चालकाने शतपावलीसाठी बाहेर पडलेल्या इसमाला जबर धडक दिली. त्यात डोक्याला मार लागल्याने इसमाचा जागीच मृत्यू झाला आहे. सिकंदर दिलावर पठाण (वय ५६, रा. शिवाजी नगर, जळगाव) असे मयत इसमाचे नाव असून याबाबत शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सिकंदर दिलावर पठाण हे जळगाव शहरातील शिवाजी नगरमध्ये परिवारासह वास्तव्यास असून ते सेंट्रींग तसेच ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत उदरनिर्वाह करीत होते. शनिवारी दि. २५ जानेवारी रोजी संध्याकाळी जेवण करून शतपावली करण्यासाठी ते बाहेर पडले असता काही अंतरावर भरधाव आलेल्या बुलेटस्वारकाने त्यांना मागून जबर धडक दिली. या धडकेत सिकंदर पठाण यांच्या डोक्याला जबर मार लागून ते जागीच गतप्राण झाले.भरधाव बुलेट पुढे एका रिक्षाला धडकली. बुलेट (एम एच १९ ई एन ६७८०) वरील चालक तरुणाला रिक्षातील नागरिकांनी पकडुन पोलिसांना बोलाविले. सिकंदर पठाण यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. कुटुंबियांना समजताच त्यांनी रुग्णालयात येऊन एकच आक्रोश केला. घटनेबद्दल रात्री उशिरापर्यंत जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.