राजगडावर फिरायला गेला, उतरताना बुरुजाचा दगड डोक्यात पडला; अनिलचं पोलीस होण्याचं स्वप्न अधुरंच.

प्रजासत्ताक दिनानिमित्त किल्ले राजगडावर फिरायला गेलेल्या एका तरुणाच्या डोक्यात बुरुजाचा दगड पडला, या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.किल्ले राजगडावर २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मोठ्या संख्येने गर्दी जमली होती. मात्र, येथेच पुण्यातील एका तरुणासोबत अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. पुण्यात पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी आलेल्या तरुणाचा किल्ले राजगडावर बुरुजाचा दगड डोक्यात पडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. गडावरील पाली या दरवाज्याजवळ गड उतरत असताना ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत एका होतकरु तरुणाचा मृत्यू झाला.अनिल विठ्ठल आवटे (वय वर्ष १८) असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या डोक्यात दगड पडून तो जखमी झाला. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचं स्थानिक डॉक्टरांकडून सांगण्यात आले.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, प्रजासत्ताक दिनानिमित रविवारी किल्ले राजगड या किल्ल्यावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी उसळली होती. यावेळी अनिल आवटे हा देखील आपल्या सहकाऱ्यांसोबत किल्ले राजगडावर फिरण्यासाठी आला होता. अनिल हा पुण्यातील धायरी परिसरात पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी खाजगी क्लासेसमध्ये अभ्यास करत होता. तो मूळचा खादगाव भाबट (ता. सेलू, जि. परभणी) येथील राहणारा असल्याची माहिती आहे.यावेळी किल्ला फिरून झाल्यावर गड उतरत असताना बुरुजाचा एक दगड निसटला आणि तो थेट अनिल याच्या डोक्यात येऊन पडला. दगड डोक्यात पडल्याने त्याच्या कानातून मोठा रक्तस्त्राव होऊ लागला. त्यानंतर त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला तात्काळ वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आलं.

या घटनेची माहिती मिळताच पोलीसही रुग्णालयात पोहोचले, पोलिसांकडून तपास करण्याची प्रक्रिया सुरु आहे. अचानक घडलेल्या या घटनेने आवटे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर गड किल्ल्यावर फिरायला येताना काळजी घेण्याचे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे. प्रजासत्तक दिनी दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जातं आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.