सकाळी विद्यार्थिनीवर अत्याचार, दुपारी शिक्षकाला गोळीबार, धक्कादायक घटनेने मोठी खळबळ.

 दोन धक्कादायक घटना घडल्या आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी गिधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 10 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आला. बहोरनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिक्षकावर गोळीबार झाला. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दोन अतिशय धक्कादायक आणि हैराण करणाऱ्या घटना घडल्या आहेत. ज्यानंतर मोठी खळबळ निर्माण झालीये. रविवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी या घटना घडल्या. गिधा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी ध्वजारोहण समारंभासाठी शाळेत जाणाऱ्या दहा वर्षाच्या मुलीवर बलात्काराची घटना घडली. दुपारी शाळेतून परतणाऱ्या शिक्षकावर गोळ्या झाडण्यात आल्या. हे प्रकरण बहोरनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. बिहारमधील या दोन्ही घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळतंय.

भोजपुर पोलिसांनी मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला अटक केलीये. मात्र, शिक्षकावर गोळीबार केलेल्या आरोपीला अजून अटक करण्यात नाही आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता पाचवीत शिकणारी विद्यार्थिनी शाळेत आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमासाठी जात होती. घरापासून काही अंतरावर ती गेली असता वाटेत एका 50 वर्षीय व्यक्तीने तिचे अपहरण केले. त्यानंतर निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.आरोपीच्या तावडीतून सुटून मुलीने घडलेला सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला. पोलिसांनी काही वेळातच आरोपीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कलमांतर्गत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून विद्यार्थिनीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. दुसरीकडे दामोदरपूर गावात राहणारे शिक्षक योगेंद्र प्रसाद हे गोळीबारानंतर गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकाची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांकडून गोळीबार करणाऱ्या आरोपीचा शोध हा घेतला जातोय. या दोन्ही घटनेने मोठी खळबळ निर्माण झाल्याचे बघायला मिळत आहे. पोलिसांकडून काही पथके गोळीबार करणाऱ्या आरोपीच्या शोधात तयार करण्यात आली आहेत. मात्र, 26 जानेवारी या दोन घटना घडल्याने सर्वांनाच धक्का बसल्याचे बघायला मिळत आहे. मुलीवर बलात्कार झाल्याचे कळाल्यानंतर नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात काही वेळ गोंधळ घातला. यानंतर पोलिसांनी त्यांची समजूत काढत त्यांना शांत केले. पुढील काही वेळात पोलिसांनी आरोपीला अटक केली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.