नायजेरियात आत्मघातकी हल्ला! लष्करी तळाला केले लक्ष्य, २७ जवान गतप्राण; अनेकजण गंभीर जखमी.

नायजेरीयाच्या ईशान्य भागातील बर्नोमध्ये लष्कराच्या तळावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला आहे. ज्यामध्ये २७ जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ईस्लामी अतिरेक्यांनी हा हल्ला घडवून आणल्याची सुत्रांची माहिती आहे.नायजेरीयाच्या ईशान्य भागातील बर्नोमध्ये लष्कराच्या तळावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला आहे. ज्यामध्ये २७ जवानांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ईस्लामी अतिरेक्यांनी हा हल्ला घडवून आणल्याची सुत्रांची माहिती आहे. तर नायजेरियन जवानांनी गेल्याच आठवड्यात ७९ अतिरेक्यांना आणि संशयित अपहरणकर्त्यांने मारले होते, त्यानंतर प्रतिहल्ला म्हणून अतिरेक्यांनी लष्करी तळाला लक्ष्य केल्याचे समजते. २७ जवानांमध्ये एका कमांडिंग ऑफिसरचाही समावेश असल्याचे देखील वृत्त आहे.

हा हल्ला नायजेरियन जवानांनी गेल्याच आठवड्यात ७९ अतिरेक्यांना आणि संशयित अपहरणकर्त्यांची मारले होते, त्याचाच परिणाम असल्याचे बोलले जातेय. गेल्या दशकभरात ईशान्येकडील इस्लामिक अतिरेक्यांकडून सुरू असलेल्या बंडखोरी आणि वायव्येकडील विविध सशस्त्र गटांनी केलेल्या हल्ल्याला प्रतिहल्ला म्हणून लष्करी तळाला लक्ष्य केले गेले.नायजेरियन सैन्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, हल्ल्याच्या वेळी अंधार दाटला होता. त्यामुळे सैनिकांना आजूबाजूचे काही दिसू शकले नाही. सध्या बऱ्याच सैनिकांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. इस्लामिक स्टेट वेस्ट आफ्रिका प्रांतातील (ISWAP) कुख्यात किल्ला टिंबक्टू ट्रँगलमध्ये हा आत्मघातकी हल्ला करणाऱ्या बॉम्बरने स्फोटकांचे भरलेले वाहन शुक्रवारी रात्री दाट झाडीत लपवून ठेवले होते. संधी मिळताच ते वाहन नायजेरियन सैन्याच्या ताफ्यावर धडकले. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी माहिती देखील अधिकाऱ्याने दिली आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.