वन पर्यटनासाठी पाच वनसफारी गाड्या व पोलिसांच्या 63 दुचाकी वाहनांचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण.

जळगाव जिल्ह्यात वन्यजीव पर्यटन व पोलीस आधुनिकीकरणाला गतीवन पर्यटनासाठी पाच वनसफारी गाड्या व पोलिसांच्या 63 दुचाकी वाहनांचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण.जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध निधीतून जळगाव जिल्ह्यातील पाल वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि जिल्ह्यातील पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी महत्वपूर्ण पावले उचलण्यात आली आहेत. वन्यजीव पर्यटनाला चालना पाल वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांच्या सोयीसाठी पाच नवीन पर्यटक गाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या गाड्यांच्या सहाय्याने 27 किलोमीटर परिसरातील वाघ, बिबट, अस्वल आणि अन्य वन्यजीवांचे दर्शन घेता येणार आहे.

या नवीन उपक्रमामुळे जिल्ह्यातील पर्यटनाला मोठी चालना मिळणार असून, 12 स्थानिक आदिवासी युवकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. या गाड्यांचे व्यवस्थापन स्थानिक वन व्यवस्थापन समितीकडे सोपविण्यात आले आहे, ज्यामुळे पर्यावरणीय संवेदनशीलतेचा विचार केला जाणार आहे. पोलीस दलाचे आधुनिकीकरण जिल्ह्यातील पोलीस दलासाठी 63 दुचाकी वाहनांचा ताफा उपलब्ध करून देण्यात आला आहे. या वाहनांचा उपयोग आपले पोलीस संकल्पना, डायल 112 आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा आणि बीट पेट्रोलिंगसाठी होणार आहे. या वाहनांमुळे पोलीस दलाची गती, प्रतिसाद क्षमता आणि कार्यक्षमता वाढणार आहे.लोकार्पण समारंभ या दोन्ही उपक्रमांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  अंकित यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.वन्यजीव संवर्धन आणि पोलीस दलाचे आधुनिकीकरण या दउद्दिष्टांसाठी राबविण्यात आलेला हा उपक्रम जिल्ह्यासाठी महत्वाचा ठरणार आहे.पर्यटन आणि सुरक्षा क्षेत्रात नवा अध्यायया लोकार्पणामुळे जळगाव जिल्ह्यातील पर्यटन आणि सुरक्षेच्या क्षेत्रात नवा अध्याय सुरू झाला आहे. वन्यजीव अभयारण्यातील सुविधा मुळे पर्यटक वाढतील.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.