शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध – पालकमंत्री गुलाबराव पाटील.

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध – पालकमंत्री गुलाबराव पाटील. जळगाव दि. 26 ‘अग्रिस्टेक’ च्या माध्यमातून मिळणाऱ्या ओळखपत्रामुळे शेतकऱ्यांच्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी त्यांना सुलभता मिळेल. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास व सक्षमता वाढणार असून शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सरकार वचनबद्ध आहे.कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याच्या दृष्टीने ‘अ‍ॅग्रिस्टॅक’ योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. शेतकऱ्यांचे ओळखपत्र हे त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे,” असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. मुसळी बु, तालुका धरणगाव येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलतं होते.

यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते नितीन पाटील, मोहन मराठे, कमलाबाई पाटील, भगवान पाटील, सीताराम पाटील, हिरामण पाटील, प्रेमराज गुंजाळ, देविदास मराठे आणि वसंत पाटील या शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात ओळखपत्र प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमास प्रांताधिकरी मनीषकुमार गायकवाड, तहसीलदार, महेंद्र सूर्यवंशी, गट विकास अधिकारी अजितसिंग पवार, गट शिक्षणाधिकारी भावना भोसले , कृषी अधिकारी देसले व कोळी, नायब तहसीलदार सातपुते साहेब व मोरे साहेब तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच सुरेखा सुरेश गुंजाळ, उपसरपंच वसंत दादा भिल, सर्व ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र पाटील व मुख्याध्यापक तसेच ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक संजय गायकवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन पी. के. पाटील यांनी मानले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.