स्वातंत्र्य,समता आणि बंधुता यावर आधारलेली आपली राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी देशात लागू करण्यात आली.

प्रजासत्ताक दिन चिरायू होवो..!
स्वातंत्र्य,समता आणि बंधुता यावर आधारलेली आपली राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी देशात लागू करण्यात आली आणि देशातील सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था उदयास आली.त्यानिमित्त हा २६ जानेवारी दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून दर वर्षी उत्साहात साजरा केला जातो. श्रीनगर येथे कार्यरत असलेले भारत मातेचे सुपुत्र ऐश्वर्य बोडके साहेब(CRPF) यांच्या शुभहस्ते ध्वज फडकवण्यात आला. विश्व राजभारती संस्थेच्या गुरूकुल इंग्लिश मिडियम स्कूल सायगाव येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला.यावेळी ध्वजचे पुजन सैनिक माता-पिता म्हणुन सौ.देवकाताई मोरे व शिवराम मोरे यांना यंदा मान मिळला.तसेच संस्थेचे प्रेरणास्थान राजेंद्र सुर्यवंशी(राजु बाबा) यांच्या हस्ते भारतमातेचे पूजन झाले.

व गुरुकुलच्या आदर्श प्रिन्सिपल प्रिया सूर्यवंशी मॅडम यांच्या हस्ते सरस्वतीमातेचे पुजन केले ,तर गावात पहिली महिला अभ्यासिका सुरू करणारे साहेबराव बच्छाव यांचे माता-पिता पार्वताबाई बच्छाव व देवमन बच्छाव यांनी स्वातंत्र्यवीरांचे पुजन केले. प्रल्हाद बच्छे यांच्या हस्ते डाॅ.बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. सैनिक पिता बापू माळी व ज्ञानेश्वर माळी इंडियन आर्मी मध्ये कार्यरत असलेले, व अलवाडी येथील आदर्श शेतकरी युवा उद्योजक ऋषितोश सूर्यवंशी यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात आला.यावेळी जयघोषात विद्यार्थ्यांची परेडही पार पडली.व विविध स्पर्धेतील गोल्ड मेडलिस्ट २७ विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. देशभक्तीपर गायन,मराठी,हिंदी,इंग्लिश या भाषेतील उत्कृष्ट भाषणे विद्यार्थ्यांनी सादर केली.यावेळी चिमुकल्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकत कौतुकाची थाप मिळवली. त्यानंतर रंगोत्सव स्पर्धेतील यशस्वी शेकडो विद्यार्थ्यांना रंगोत्सव सेलिब्रेशन ,मुंबई मार्फत प्रमाणपत्र मिळालेल्या चिमुकल्यांचे कौतुक करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजक संस्थेचे अध्यक्ष भुषण सुर्यवंशी सर व विश्व गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलचे संचालक शुभम सुर्यवंशी सर होते तर गुरुकुलच्या प्रिन्सिपल प्रिया सुर्यवंशी मॅडम यांच्या मार्गदर्शनाने सांस्कृतिक विभाग प्रमुखाची जबाबदारी घेत वैशाली पाटील मॅडम यांनी कार्यक्रम पार पाडला.तसेच कार्यक्रम यशस्वितेसाठी रंगोत्सव स्पर्धा विभाग संयोजक माधुरी माळी मॅडम,स्वागत विभाग प्रमुख अनिता बच्छे मॅडम ,लिना भदाने मॅडम,कला विभाग मॅडम मिनाज मन्सुरी मॅडम , प्रगती माळी मॅडम,देवेंद्र कुलकर्णी सर,विमलताई पाटील, भारती साळुंखे तसेच शिक्षकेतर कर्मचारी सचिन पगार ,नाना देवरे, श्याम शिंदे, लखन वाघ, आदिंनी मेहनत घेतली.व नितीन मांडगे, सागर अहिरे, जय पाटील यांचे सहकार्य लाभले.उत्कृष्ट सुत्रसंचालन वैशाली पाटील तर मधुर असे स्वागत गीत गुरुकुलच्या चिमुकल्यांनी म्हटले. तसेच गणतंत्र दिन विशेष माहिती भाषणावेळी विद्यार्थ्यांनी सांगितली. तसेच पोषण आहारावर विद्यार्थ्यांनी नाटक सादर केले. चांगला व पौष्टिक आहार विद्यार्थ्यांनी घ्यावा हा संदेश नाटकाद्वारे देण्यात आला.यावेळी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी ,पंचक्रोशितील ग्रामस्थ व पालक वर्ग उपस्थित होते. सैनिक पत्नी अर्चनाताई ऐश्वर्य बोडके व अमोल शिरोडे यांनी चिमुकल्यांसाठी चॉकलेट वाटप केल्या.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.