छत्रपती संभाजीनगर शहरात दि २४ जानेवारी रोजी छत्रपती महाविद्यालय येथे प्रभु विश्वकर्मा दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला.हा सोहळा शहरातील सकल सुतार समाजा तर्फे आयोजित केला होता.प्रभु विश्वकर्मा,ज्यांना जगाचे शिल्पकार मानले जाते, त्यांच्या सन्मानार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यात बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे ,मा.आमदार समाजभुषण डॉ.संजय रायमुलकर,प्रशासकीय मुख्य समन्वयक विद्यानंद मानकर,विश्वकर्मा विराट संघाचे चंदुबापु गवळी,उद्योजक भगवान राऊत,विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळाचे वाल्मिक सुराशे,प्रा.विजय रायमल,नगर सेविका माधुरी ताई अदवंत,सामाजिक कार्यकर्ते बालाजी खरडे पाटील,कामगार नेते सतीश शिंदे,साक्षी पांचाळ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. समाजातील सर्व संघटनांना एका व्यासपीठावर एकत्र येऊन समाज कार्य करण्याचे आवाहन डॉ.संजय रायमुलकर यांनी केले. त्यांनी सांगीतले, “समाजाच्या सर्व स्तरातील संघटना एकत्र येऊन काम करणे हे आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे. यामुळे समाजात सामाजिक समरसता वाढेल आणि समाजाच्या विकासाच्या मार्गात आणखी वेग येईल.”
प्रभु विश्वकर्मा दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्याला शहरातील अनेक प्रमुख व्यक्तिमत्वे,उद्योजक,व्यवसायिक,वारकरी संप्रदायातील महाराज,इन्फ्लुएन्सर,जेष्ठ समाजसेवक उपस्थित होते या वेळी त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात प्रभू विश्वकर्मा दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले, ज्यामध्ये वर्षभराच्या महत्त्वाच्या तिथी आणि सण-उत्सवांची माहिती दिली गेली आहे.दिनदर्शिकेचे प्रकाशन करताना बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले, “प्रभू विश्वकर्मा हे विश्व निर्मितीचे अधिष्ठाता मानले जातात. त्यांची सर्जनशीलता आणि परिश्रमाचे तत्त्व आजच्या आधुनिक युगातही प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन श्रमाचा सन्मान आणि हाती घेतलेल्या कार्यात कौशल्य टिकवून ठेवण्याचा संदेश ही दिनदर्शिका देईल. प्रभू विश्वकर्मा दिनदर्शिका समाजाला प्रगतीचा मार्ग दाखवेल, याचा विश्वास आहे. त्यांच्या सन्मानार्थ हा सोहळा आयोजित करणे हे आमच्यासाठी अभिमानाचे आहे.”
सांस्कृतिक कार्यक्रमसोहळा दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शहरातील कलाकारांनी संगीत प्रस्तुति करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमात प्रभू विश्वकर्मा यांच्या जीवन आणि कार्यावर आधारित माहिती देण्यात आली, ज्यामुळे उपस्थितांना त्यांच्या महत्त्वाची जाणीव करून देण्यात आली.“असे सोहळे समाजात एकता आणि सामाजिक भावना जागृत करतात. यामुळे समाजातील विविध संघटना एकत्र येऊन काम करण्याची प्रेरणा मिळते “असे विद्यानंद मानकर म्हणाले.समाजातील तरुणांनी सातत्याने प्रयत्न करून सर्वांना एकत्रित ठेवण्या साठीचे काम करावे असे चंदुबापु गवळी म्हणाले.प्रत्येक गरजू आणि गरीब वर्गाला लाभ मिळवून देण्यासाठी सरकारनं पंतप्रधान विश्वकर्मा योजना योजना सुरू केलीय या योजनेचा लाभ समाज बांधवांनी घ्यावा असे आवाहन संजय बोराडे यांनी प्रास्ताविक करते वेळी उपस्थित समाज बांधवांना केले.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संजय बोराडे, हेमंत जाधव, नागेश साखरे, विलास वाघ,अमोल आजिनाथ, मारुती राजगुरू, धनंजय साळुंके, बाळासाहेब रायमल, संतोष सपकाळ, रमेश काळे,बाळासाहेब काळे, गणेश पांचाळ, दत्ता जाधव,शत्रुघ्न सुरासे, ज्ञानेश्वर रायमल, भगवान जाधव, गणेश पगार, राजे राजगुरू,गणेश बोद्रे,गणेश चन्ने,राजेश भोलनकर,राजेंद्र रथकर, गणेश दर्जे(पांचाळ), भागवत पांचाळ तसेच सकल सुतार समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे काम केले.सोहळ्याच्या समारोपानंतर हेमंत जाधव यांनी भविष्यात अशा प्रकारचे कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्याची घोषणा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भागवत पांचाळ व आभार प्रदर्शन शत्रुघ्न सुराशे यांनी केले.









