उपकेंद्र पिलखोड अंतर्गत अलवाडी, तामसवाडी, देशमुखवाडी, पिलखोड येथे स्पर्श कुष्ठरोग अभियान मोहिमेला प्रारंभ.

उपकेंद्र पिलखोड अंतर्गत अलवाडी, तामसवाडी, देशमुखवाडी, पिलखोड येथे स्पर्श कुष्ठरोग अभियान मोहिमेला प्रारंभ. प्राथमिक आरोग्य केंद्र शिरसगाव अंतर्गत उपकेंद्र पिलखोड, तामसवाडी, अलवाडी देशमुखवाडी, येथे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ, सचिन भायेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत पाटील. आरोग्य संचालक मोरे साहेब तसेच शिरसगाव वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित भोसले. तालुका कुष्ठरोग तंत्रज्ञ हमीद पठाण, धनंजय जाधव, तालुका पर्यवेक्षक ममराज राठोड,शिरसगाव आरोग्य सहाय्यक सुरेंद्र शितोळे, हेमंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शना नुसार स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान 2025 विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

ग्रामसभेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे ग्रामसभा भाषण वाचन, शाळा महाविद्यालय येथे निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा,प्रभात फेरी काढून गावात कुष्ठरोग आजाराविषयीं ग्रामस्थ यांना सदर आजाराचे लवकर निदान व उपचाराचे महत्व पटवून देण्यासाठी पथनाट्य, घोषवाक्य, तसेच आरोग्य विभाग कुष्ठरोग संचालय थीमनुसार..”कुष्ठरोगाबाबत एकत्रितपणे जनजागृती वृद्धिंगत करू त्या बाबतचा गैरसमज दूर करू. कुष्ठरोगाने बाधित एकही ती व्यक्ती मागे राहणार नाही याची दक्षता घेऊ.”त्यानुसार दिनांक. 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीत घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण करून गावात सदर आजाराचे महत्व, तसेच सदर आजाराबाबत असणारा गैरसमज दूर करून सर्व नागरिकांची तपासणी सुरु आहे, व लवकर निदान लवकर उपचार निरोगी ठेवा आपला परिवार.. असे लोकांना समजून मार्गदर्शन कामी पिलखोड आरोग्यसेवक हेमंत पवार, गत प्रवर्तक, सुवर्णा पाटील, राजश्री पाटील, पिलखोड सर्व आशासेविका मेहनत घेत आहेत सदर अभियानास परिसरातील सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत प्रशासन ग्रामसेवक याचे देखील योगदान लाभत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.