एसटीची भाडेवाढ खरंच झाली का? अजित पवारांच्या एका वक्तव्याने संभ्रम.

राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी बसचे भाडे १४.९५ टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. महागाई वाढल्यामुळे आणि विविध खर्चामुळे ही भाडेवाढ प्रस्तावित केली आहे, पण अंतिम निर्णय मुख्यमंत्री परदेशातून आल्यानंतर घेण्यात येईल.ग्रामीण भागातील जीवन वाहिनी असलेल्या लाल परीची अर्थात एसटीची भाडेवाढ करण्याचा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणाने घेतला आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाची २७६ वी बैठक परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव , राज्य परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आज संपन्न झाली. या बैठकील राज्य परिवहन प्राधिकरणाचे सदस्य अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतुक) आणि परिवहन आयुक्त देखील उपस्थित होते. या बैठकीत एसटीची १४.९५ टक्के भाडे वाढ करण्यास मंजूरी मिळाली आहे. मात्र आता राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्या एका वक्तव्यानंतर एसटीच्या तिकीट दारात वाढ झाली का? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

एसटीच्या संभाव्य भाडेवाढ बाबत देखील अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जास्तीत जास्त नवीन बसेस घेऊन चांगली सुविधा शहरी आणि ग्रामीण भागातील प्रवाशांना द्यायची आहे. अशी चर्चा सुरू आहे मात्र अंतिम निर्णय अजून झालेला नाही. कारण मुख्यमंत्री पहाटेच परदेशातून आलेले आहेत. हे महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालूनच घ्यायचे असतात. त्यामुळे त्यांना विचारून पुढचा निर्णय घेण्यात येईल. शेवटी महामंडळ पण व्यवस्थित चाललं पाहिजे आणि जनतेला पण त्रास कमी झाला पाहिजे. असा मध्यमार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.दरम्यान डिझेल, चेसीस, टायर यांच्या किमतीत झालेली वाढ तसेच महागाई भत्त्यात वाढ झाल्यामुळे आपोआप भाडेवाढ सुत्रानुसार उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांनी दिनांक ०१ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या पत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसच्या प्रवासी भाडेदरात वाढ करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास राज्य परिवहन प्राधिकरणाच्या २७६ व्या बैठकीत मंजूरी मिळाली आहे. मात्र अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता नवीन भाडेवाढ आकारली जाणार का? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.