सुप्रिया सुळे प्रेक्षकांत, अजित पवार व्यासपीठावर; इंदापुरात मानापमान नाट्य; काय घडलं नेमकं?

पुण्याच्या इंदापुरातील सरकारी कार्यक्रमात नाराजीनाट्य पाहायला मिळालं. या कार्यक्रमात स्थानिक खासदार सुप्रिया सुळे आणि माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांना प्रेक्षकांमध्ये बसावं लागलं.पुण्याच्या इंदापुरातील सरकारी कार्यक्रमात नाराजीनाट्य पाहायला मिळालं. या कार्यक्रमात स्थानिक खासदार सुप्रिया सुळे आणि माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांना प्रेक्षकांमध्ये बसावं लागलं. तर उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री आणि स्थानिक आमदार दत्तात्रय भरणे व्यासपीठावर विराजमान झाले. सरकारी कार्यक्रमात प्रोटोकॉल पाळला न गेल्याबद्दल सुळेंनी नाराजी व्यक्त केली.

इंदापुरात अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती हजर होते. इंदापूर तालुका बारामती लोकसभा मतदारसंघात येतो. सुप्रिया सुळे या मतदारसंघाच्या खासदार आहेत. पण त्यांना या कार्यक्रमाचं निमंत्रण नव्हतं. त्याबद्दल त्यांनी नाराजी बोलून दाखवली.स्थानिक खासदार असूनही सुप्रिया सुळे यांचं नाव इंदापुरातील कार्यक्रम पत्रिकेत नव्हतं. सरकारी शिष्टाचार पाळला जात नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. कार्यक्रम सुरु होण्याआधी सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादीचे आमदार आणि मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याशी संवाद साधला. तर अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातही संवाद साधला. पण अजित पवार आणि सुप्रिया सुळे या भाऊ, बहिणींमधील दुरावा यावेळीही पाहायला मिळाला. दोघांनी एकमेकांशी बोलणं टाळलं.बारामतीसह राज्यभरातील अनेक सरकारी कार्यक्रमांना विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना बोलावलं जात नाही, कार्यक्रम पत्रिकेवर त्यांची नावं नसतात, असा आक्षेप खासदार सुप्रिया सुळेंना अनेकदा नोंदवला आहे. इंदापुरातील कार्यक्रमातही तसाच प्रकार पाहायला मिळाला. स्थानिक खासदार असूनही सुळे यांचं नाव कार्यक्रम पत्रिकेत नव्हतं. व्यासपीठावर त्यांच्यासाठी आसन व्यवस्था नव्हती. त्यामुळे त्यांना प्रेक्षकांमध्ये बसावं लागलं. त्यांचा सत्कारदेखील खालीच करण्यात आला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.