मविआची सत्ता पुन्हा उलथवली; ठाकरेंची नगरसेविका फुटली, निलेश राणे कसे ठरले किंगमेकर?

महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेविका श्रुती राकेश वर्धम फुटल्याने कुडाळची नगरपंचायत महायुतीच्या ताब्यात गेली आहे.शिवसेना आमदार निलेश राणे यांचं स्वप्न अखेर पूर्ण झालं असून आमदार झाल्यानंतर कुडाळ नगरपंचायतीत सत्ताबदल झाला आहे. कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी अखेर प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांची निवड झाली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेत महायुतीचे कोकणातील युवा नेते सध्या ॲक्शन मोडवर आहेत. याचाच भाग म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ नगरपंचायतीवर महायुतीमधील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा भगवा फडकला आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेविका श्रुती राकेश वर्धम फुटल्याने कुडाळची नगरपंचायत महायुतीच्या ताब्यात गेली आहे.तळकोकणातून ठाकरे गटाला सुरुंग लावण्यास आमदार निलेश राणे यांनी सुरुवात केली आहे. कोकणात येत्या काही दिवसात महाविकास आघाडीतून महायुतीत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे. याचाच भाग म्हणून रत्नागिरी येथे मंत्री उदय सामंत आणि आमदार किरण भैय्या सामंत यांच्या उपस्थित माजी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी शेकडो पदाधिकाऱ्यांसह प्रवेश केला आहे.

महाविकास आघाडीकडे गेली पाऊणे तीन वर्षे कुडाळ नगरपंचायत होती. ती अखेर महायुतीकडे आणण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हा प्रमुख आनंद शिरवलकर तसेच शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना यश आले आहे. त्यामुळे कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष निवडणुकीत आमदार निलेश राणे किंगमेकर ठरले आहेत.महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची एक नगरसेविका अचानक फुटल्याने, तसेच तिने आपले मतदान भाजप प्रणित सिद्धिविनायक नगर विकास आघाडीच्या नगरसेविका सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांना केल्याने पिठासीन तसेच निवडणूक अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर या कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष झाल्याचे घोषित केले. तसेच कागदोपत्री जरी ही नगरपंचायत भाजप म्हणजेच महायुतीकडे असली तरी आता या कुडाळच्या नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.दरम्यान आमदार निलेश राणे यांनी सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर या नगराध्यक्ष झाल्याबद्दल त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आग्रे उपस्थित होते. तसेच शिंदे-शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी “शिवसेना झिंदाबाद” कोण आला रे कोण आला” निलेश राणे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा जोरदार घोषणा देत जल्लोष साजरा केला.कुडाळ नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचीच सत्ता होती. महाविकास आघाडीचे ९ नगरसेवक तर महायुतीचे ८ नगरसेवक असे एकूण १७ नगरसेवक होते. तसेच महाविकास आघाडीची सत्ता असल्याने प्रत्येक नगराध्यक्षाला सव्वा-सव्वा वर्षाचा कालावधी ठरलेला होता.महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या नगरसेविका आफ्रिन करोल या २०२२ मध्ये नगराध्यक्षा झाल्या. त्यांचा सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पुन्हा काँग्रेसच्याच म्हणजेच महाविकास आघाडीच्या सौ. अक्षता खटावकर या ७ जून २०२३ रोजी नगराध्यक्ष पदी विराजमान झाल्या. त्यांनी ७ जानेवारी २०२५ रोजी आपल्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे ही नगराध्यक्ष पदाची निवडणूक लागली होती.काल शुक्रवार दि. २४ जानेवारी रोजी कुडाळ नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया आवाजी मतदानाने पार पडली. यावेळी हात वर (आवाजी मतदान) करुन मतदान घेण्यात आले असता, ठाकरे गटाच्या म्हणजेच महाविकास आघाडीच्या नगरसेविका सौ. श्रुती राकेश वर्धम यांनी भाजपच्या म्हणजेच महायुतीच्या सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या बाजूने हात वर करुन मतदान केल्याने अखेर सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांची कुडाळच्या नगराध्यक्ष पदी निवड करण्यात आली.काल शुक्रवार दि. २४ जानेवारी रोजी कुडाळ नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया आवाजी मतदानाने पार पडली. यावेळी हात वर (आवाजी मतदान) करुन मतदान घेण्यात आले असता, ठाकरे गटाच्या म्हणजेच महाविकास आघाडीच्या नगरसेविका सौ. श्रुती राकेश वर्धम यांनी भाजपच्या म्हणजेच महायुतीच्या सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्या बाजूने हात वर करुन मतदान केल्याने अखेर सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांची कुडाळच्या नगराध्यक्ष पदी निवड करण्यात आली.दरम्यान सौ.प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर या शिंदे-शिवसेनेच्या नगराध्यक्ष असल्याचे त्यांचे पती व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर यांनी सांगितले. तर जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनाही विचारले असता ते म्हणाले ही नगरपंचायत आता शिंदे-शिवसेनेच्या ताब्यात आली असल्याचे सांगितले. तर नगराध्यक्ष निवडीवेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष, कुडाळ तालुकाध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मात्र अनुपस्थित राहिले असल्याचे यावेळी पाहायला मिळाल. कुडाळ नगरपंचायत ही महायुतीकडे आणण्यासाठी शिवसेनेचे विनायक राणे, अभिषेक गावडे, राकेश कांदे, गटनेते विलास कुडाळकर, गणेश भोगटे, चेतन पडते, चंदन कांबळी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.