मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाला, अमेरिका लवकरच भारताला सोपवणार.

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने भारत-अमेरिका प्रत्यार्पण करारानुसार राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. तहव्वूर राणाला एफबीआयने २००९ मध्ये अटक केली होती. नोव्हेंबर १३, २०२४ रोजी राणाने कनिष्ठ न्यायालयाच्या प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरुद्ध अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयात अपील केले, जे २१ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले.मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ रोजी करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा दोषी तहव्वूर राणा याला लवकरच भारतात आणले जाणार आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने भारत-अमेरिका प्रत्यार्पण करारानुसार राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. तहव्वूर राणाला एफबीआयने २००९ मध्ये अटक केली होती. नोव्हेंबर १३, २०२४ रोजी राणाने कनिष्ठ न्यायालयाच्या प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरुद्ध अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयात अपील केले, जे २१ जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले.प्रत्यार्पण टाळण्यासाठी राणाची ही शेवटची संधी होती. यापूर्वी त्याने सॅन फ्रान्सिस्को येथील न्यायालयात अपील केले होते, जिथे त्याची याचिका फेटाळण्यात आली होती. दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण करारानुसार त्याला भारतात पाठवले जाऊ शकते, असे अमेरिकन न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले होते. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या ४०५ पानांच्या आरोपपत्रात आरोपी म्हणून राणाच्या नावाचाही उल्लेख आहे. त्यानुसार राणा हा आयएसआय आणि लष्कर-ए-तोयबाचा सदस्य आहे. या आरोपपत्रानुसार राणा हल्ल्याचा मुख्य आरोपी, डेव्हिड कोलमन हेडली याला मदत करत होता.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी समुद्रामार्गे भारतात शिरलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. या हल्ल्यात १६६ लोकांनी आपला प्राण गमावला. तरस, ३०० जण जखमी झाले. मृतांमध्ये काही अमेरिकन नागरिकांचाही समावेश आहे. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पोलिसांनी ९ दहशतवाद्यांना ठार केले. आणि अजमल कसाबला अटक केली. त्याला २०१२ मध्ये फाशी देण्यात आली होती. राणा-हेडलीने मुंबई हल्ल्याची ब्ल्यू प्रिंट तयार केली होती. मुंबई पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, राणा भारतात आल्यानंतर हल्ल्याचे ठिकाण आणि राहण्याची ठिकाणे सांगून दहशतवाद्यांना मदत करत होता. राणानेच ब्ल्यू प्रिंट तयार केली होती, ज्याच्या आधारे हा हल्ला करण्यात आला होता. मुंबई हल्ल्याचा कट रचण्यात राणाची मोठी भूमिका होती, असे आरोपपत्रात म्हटले आहे.प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरुद्ध राणाने केलेले अपील अमेरिकन कोर्टाने १५ ऑगस्ट रोजी फेटाळले होते. दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण करारानुसार त्याला भारतात पाठवले जाऊ शकते, असे अमेरिकन न्यायालयाने १५ ऑगस्ट रोजी दिलेल्या निर्णयात म्हटले होते. परंतु, भारताच्या ताब्यात जाऊ नये म्हणून पाकिस्तानी वंशाच्या तहव्वूर राणाने अमेरिकेच्या न्यायालयात हेबियस कॉर्पस म्हणजेच बंदी प्रत्यक्षीकरण दाखल केला होता.(कैदयाला न्यायालयात प्रत्यक्ष हजर करण्याची आज्ञा)लॉस एंजेलिसच्या जिल्हा न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले होते की, भारताने तहव्वूरच्या प्रत्यार्पणाची मागणी ज्या आरोपांच्या आधारे केली आहे, त्या आरोपांचा विचार करून त्याच्या प्रत्यार्पणाला परवानगी दिली जाऊ शकते.

आपल्या विरोधात निकाल दिल्यानंतर राणाने नवव्या सर्किट कोर्टात दुसरी याचिका दाखल केली होती. याबाबतचा निर्णय गुरुवारी आला. ज्यामध्ये हेबियस कॉर्पस याचिका फेटाळण्यात आली होती.मुंबईवरील हल्ल्यासंदर्भात राणावर लावण्यात आलेल्या आरोपांचे भक्कम पुरावे भारताने दिले आहेत. गेल्या वर्षी न्यायालयीन सुनावणीदरम्यान सरकारी वकिलांनी असा युक्तिवाद केला होता की, तहव्वूर हा हल्ल्याचा मास्टरमाइंड डेव्हिड हेडलीचा बालपणीचा मित्र आणि लष्कर-ए-तैयबासोबत काम करत आहे. हेडलीला आर्थिक मदत देऊन तहव्वूर दहशतवादी संघटना आणि दहशतवाद्यांना पाठिंबा देत होता. हेडली कोणाला भेटत होता, काय बोलत होता याची माहिती राणाकडे होती. त्याला हल्ल्याचे नियोजन आणि काही ठिकाणांची नावेही माहीत होती. राणा हा या संपूर्ण कटाचा एक भाग होता. आणि त्याने दहशतवादी हल्ल्यासाठी निधी पुरवल्याचा गुन्हा केल्याचा पूर्ण संशय आहे, असे अमेरिकन सरकारने म्हटले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.