वानवडीतील संविधान चौक येथे शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास पीएमपी बस आणि अपघातग्रस्त डंपरचा किरकोळ अपघात झाला. डंपर घासल्याने बसचा आरसा तुटला. त्यावरून देशमुख आणि बाभूळकर यांच्यात वाद झाला.कचरा वाहतूक करणाऱ्या महापालिकेच्या डंपरने पीएमपी चालकाला चिरडल्याचा धक्कादायक प्रकार वानवडीत घडला. बसचा आरसा तोडून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या डंपरचालकाला पीएमपी चालकाने सुमारे अर्धा किलोमीटर अंतरचा पाठलाग करून थांबवले. डंपरचालकाने गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला असता, धक्का लागून पीएमपीचा चालक खाली पडला. डंपरचे चाक त्यांच्या अंगावरून गेले, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. संजय मच्छिंद्र देशमुख ( वय ५० रा. काळेपडळ) असे मृत्युमुखी पडलेल्या चालकाचे नाव आहे.










