भंडारा जवाहरनगर येथे शुक्रवारी सकाळी आयुधनिर्माणीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात आठ कर्मचारी मृत्यूमुखी आणि पाच जण गंभीर जखमी झाले. स्फोटामुळे मोठा खड्डा पडला आणि सुमारे पंधरा किलोमीटरच्या परिघातील गावांना हादरे बसले.जवाहरनगर आयुधनिर्माणीतील कमी तापमानाच्या प्लास्टिक स्फोटक विभागात शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास भीषण स्फोट झाला. यात आठ कर्मचारी मृत्युमुखी पडले, तर पाच जण गंभीर जखमी आहेत. हा स्फोट इतका शक्तिशाली होता, की त्यामुळे मोठा खड्डा पडला. त्यात संपूर्ण इमारत कोसळली. सुमारे पंधरा किलोमीटरच्या परिघातील गावांना या स्फोटाचे हादरे बसले.










