बांदेकरांचा बुक्का, ठाकरेंना धक्का; उदय सामंतांचा दावा खरा ठरला, पहिला नेता फुटला.

नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनीही जोरदार फील्डिंग लावली होती. मात्र, एका मताने महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला.कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष पदासाठी आज पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला मोठा झटका बसला. महायुतीतर्फे भाजपच्या प्राजक्ता बांदेकर विजयी झाल्या आहेत. भाजपने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचं एक मत फोडून विजय साकारला. ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांच्यासाठीही हा मोठा धक्का मानला जात आहे. नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनीही जोरदार फील्डिंग लावली होती.

मात्र, एका मतानेकुडाळ नगरपंचायतीवर ठाकरे गट आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडीची सत्ता होती. दोन्ही पक्षांमध्ये ठरलेल्या अडीच-अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेसच्या अक्षता खटावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे नगराध्यक्ष पदाचा राजीनामा सोपवला. त्यामुळे नगराध्यक्ष पोटनिवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केला होता.२० जानेवारीला नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नगरसेविका सई काळप, तर महायुतीकडून प्राजक्ता बांदेकर या दोघींनी उमेदवारी अर्ज मुख्याधिकारी अरविंद नातूंकडे सादर केला होता. त्या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवारी) नगराध्यपदाची निवडणूक झाली.कुडाळ नगरपंचायतीत १७ नगरसेवक आहेत. यामध्ये ठाकरे गटाचे ७ आणि काँग्रेसचे दोन असे महाविकास आघाडीचे नऊ संख्याबळ आहे. तर भाजपचे ८ नगरसेवक आहेत. त्यामुळे केवळ एका नगरसेवकामुळे नगराध्यक्षपद ठरणार होते. ठाकरे गटाच्या एक नगरसेविका नॉट रिचेबल होत्या. आणि निवडणुकीचा गेम पालटला.दरम्यान, सिंधुदुर्गमध्ये आगामी काळात जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी कुडाळची नगराध्यक्ष पदाची निवडणूक नांदी ठरेल. पुढच्या सर्व निवडणुकात महायुतीच्या माध्यमातून आम्ही विजय मिळवू अशा प्रकारचा दावा आमदार निलेश राणे यांनी केला आहे.कुडाळ नगरपंचायतीतील नगराध्यक्ष निवडीनंतर निलेश राणे यांनी कार्यकर्त्यांसह आनंदोत्सवात सहभाग घेतला होता. यानंतर बोलताना राणे म्हणाले, अडीच वर्ष कुडाळ शहराचा विकास रखडला होता आणि म्हणूनच इथला महविकास आघाडीचा एक नगरसेवक फुटला आहे. आता खऱ्या अर्थाने कुडाळचा विकास होईल.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.