जळगाव जिल्ह्यात 1 लाख लखपती दीदी तयार करण्याचा निर्धार.

महिला बचत गट चळवळ अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. मुंबईत होणाऱ्या राज्यस्तरीय सरस प्रदर्शनामुळे ग्रामीण भागातील महिलांना येण्यास अडचणी येत होत्या. यावर उपाय म्हणून राज्यात विविध विभागांत ‘मिनी सरस प्रदर्शन’ सुरू करण्यात आले. यामुळे बचत गटाच्या उलाढालीत लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबईत होत असलेल्या प्रदर्शनात 10 कोटींची उलाढाल होत असे, परंतु विभागीय प्रदर्शनांमुळे ही उलाढाल 22 कोटींपर्यंत पोहोचली आहे, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.जळगाव जिल्ह्यातील उमेदच्या वतीने आयोजित मिनी सरस प्रदर्शन-2025 चे उद्घाटन त्यांच्या हस्ते जि. एस. ग्राऊंडवर झाले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील बचत गट चळवळीला अधिक व्यापक करून 1 लाख लखपती दीदी तयार करण्याचा निर्धार व्यक्त केला.

राज्यात सुमारे 65 लाख महिला बचत गट कार्यरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. या माध्यमातून राज्यातील महिला केवळ देशांतर्गतच नव्हे, तर परदेशातही आपल्या वस्तू निर्यात करत आहेत. राष्ट्रीयकृत बँकाही बचत गटांना मोठ्या प्रमाणावर कर्ज पुरवत असून, त्याचे नियमित पुनर्भरण होत असल्याने बँकांचे एनपीए टाळले जात आहे. राज्यातील बँकांनी आतापर्यंत 18 हजार कोटी रुपयांचे कर्ज महिला बचत गटांना वितरित केल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.महिला बचत गटांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी वस्तूंचे आकर्षक पॅकिंग व विपणन गरजेचे आहे. याची जाणीव ठेवून 2010 मध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना मुक्ताई सरस प्रदर्शनाची सुरुवात केल्याचा आनंद खा. स्मिता वाघ यांनी व्यक्त केला. अशा प्रदर्शनांच्या माध्यमातून माऊथ पब्लिसिटी महत्त्वाची ठरते, असेही त्यांनी नमूद केले.प्रदर्शनाच्या उद्घाटन सोहळ्यास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अंकित, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक राजीव लोखंडे यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी प्रसाद यांनी 23 ते 27 जानेवारी दरम्यान होणाऱ्या या प्रदर्शनाला जळगावकरांनी मोठ्या संख्येने भेट देऊन महिलांच्या सक्षमीकरणाला हातभार लावावा, असे आवाहन केले.

प्रदर्शनामध्ये मंत्री गिरीश महाजन, खा. स्मिता वाघ यांनी सर्व स्टॉल्सना भेट देऊन खरेदी केली व खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. जिल्हाधिकारी प्रसाद यांनाही आग्रहाने सहभागी करून घेतल्याने स्टॉल धारक महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    पाल वनक्षेत्रात अवैध डिंक संकलनावर मोठी कारवाई : १५ लाखांचा मुद्देमाल जप्त.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    फुलगावातील ‘दस्तक ड्रॉप इन’ इंधन केंद्र सील – सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन उघड.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.

    बोगस केळी पिकाच्या नावाखाली ६६ कोटींचा विमा घोटाळा; मुक्ताईनगरात ५ CSC केंद्रचालकांवर कारवाई.